Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
ढालगज [ (द्राघीयस् + जंघी) = दीर्घजंघी=ढालजँग = ढालजग = ढालगज ] जिच्या जंघा लांब आहेत अशी स्त्री-अशा बाईसारखी वागणारी मुलगी. द्राघ = ढाल. (भा. इ. १८३४)
ढास [ ऊर्ध्वश्वास = ढास. उड्ढआस = ढ्ढास = ढास ] (भा. इ. १८३४)
ढासण १ [ अध्यासन seat = ढासण ]
-२ [ ध्वंसनं ] (निर्धास्त पहा )
ढाळक [ ध्वल. ध्वालक = ढाळक ] (धा. सा. श.)
ढाळणें [द्राह् = द्राहर = ढाल = ढाळ. द्राह् थकणें ] ढाळणें म्ह० थकणें. (भा. इ. १८३४)
ढीग [ दिह् २ उपचये, to increase. दिह् = ढीग ]
[दिह् to increase = डिघ् = ढीग ] रास.
ढुंगण १ [ ढु + अंगण (अवयव ) (ढु = ढोपर शब्दांतील ढूर्) ] (स.मं.)
-२ [ अधोंऽग = ढोंग = ढुंग = ढुंगण (+ ण ) ] (भा. इ. १८३६ )
-३ [ अधोंगम् = ढुंगण ] ढुंगण म्ह० गुह्यांग, गांड. ढुंगण धुणें हें वाक्य गांड धुणें याबद्दल संभावित बोलतात.
-४ [ दृंहण ( दृढीकरण ) = ढुंगण ] शरीराला दृढ करणारें अंग.
ढुस्स [ धूश् १० कांतिकरणे - to burn shiningly चकाकणें = ढुस्स ] shinig black. ( धुश्श पहा) (काळें) ढूस १ [ धूसर = ढूसअ = ढूस ] (भा. इ. १८३४)
-२ [दूषिः (कृत्या) = ढूस ] काळी ढूस म्हणजे कृत्येसारखी काळी (अथर्व वेद)
ढेकर [ द्रेक् १ शब्दे ] (धातुकोश-ढेकर पहा)
ढेंकुण [ दंशकृमि = डंखकुण = डंखुण = ढेंकुण ] (भा. इ. १८३२ )
ढेप [ डिप् गोळा करणें. डेप = ढेप ] गुळाचा गोळा. ( भा. इ. १८३४)
ढेपसा [ द्रप्सः lower thin part of curds = ढेपसा ]
ढेरणें [ ध्रेकृ शब्दे । ध्रेक्= ढेर्=ढेरणें किंवा ढोरणें ] गुरूं ढोरतें म्हणजे झोंपतांना विशिष्ट शब्द करतें. मूळ धातू ध्रोोकृ असा हि असावा. ( भा. इ. १८३४)
ढोंपर [ ' कूर्पर ' शब्दाप्रमाणें ‘ ढुर्पर ' शब्द असावा व तो पायाच्या त्या भागाला लागत असावा. सध्यां संस्कृतांत हा शब्द लुप्त आहे. ( स. मं. )
ढोर [ धुर्यः (beast of burden) = ढोर ]
ढोरणें [ धेकृ शब्दे ] (ढेरणें पहा)
ढोल [ ढोलः वाद्यविशेष. ढक्का ढोलप्रिया (रुद्रयामल ) ] (भा. इ. १८३४)
ढोसणें १ [ अध्यसनं = ढोसणें ] ढोसणें म्ह० अति भरणें. पानीयं अध्यस्यति = पाणी ढोसतो.
-२ [ अध्यशनं = ढोसणें ] ढोसणें म्ह० आति खाणें. (भा. इ १८३६)
-३ [ अध्यशन = ( अ लोप ) ढोसणें ] अध्यशन म्हणजे भरल्या पोटीं खाणें. ढारू ढोसणें म्हणजे वाजवीपेक्षां जास्त दारू पिणें. (भा. इ. १८३७)