Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
ट
टक [ (दृश् १ प्रेक्षणे ) दृक् = डक् = टक ] टक लावणें म्हणजे दृष्टि लावून बसणें.
टकलें [ ताल-तालक ] ( टाळकें ३ पहा)
टका [ टंकक = टकअ = टक. टंक = टांक ]
येथें पहिल्या उदाहरणांत अपभ्रंश होतांना अनुस्वाराचा लोप झाला आहे, व दुसर्या उदाहरणांत अनुस्वाराचा अनुनासिक झाला आहे. (भा. इ. १८३३)
टक्कर [ (स्त्री) टक्कर (blow on the head ) = टक्कर ( स्त्री ) ] (भा. इ. १८३५)
टक्कल [ ताल-तालक ] ( टाळकें ३ पहा)
टंगडी [टंगा] (टांग पहा)
टंगळमंगळ १ [ तङ्गनं मंङ्गनं = टंगळमंगळ. तङ्ग् स्खलने व मङ्ग् गतौ ] टंगळमंगळ म्ह० स्खलन, चुकारपणा. (भा. इ. १८३६)
-२ [तग् (तंग्) अडखळणें व मंघ् फसविणें. तंग+ मंघ् ] टंगळमंगळ म्ह० अडवणूक व फसवणूक करणें.
टचकारा [ त्वचाग्रहः = टचकारा ]
टंचाई १ [ तंच् संकोचने. तंचतिः = टंचाई ] संकोच, अल्पीभाव.
टचकन् [ तस् ४ उपक्षये ] ( धातुकोश-टचक पहा)
टणक [ तर्णक = टणक ] तर्णक = वत्स young.
टणका [ तर्णकः (वत्सः young one) = टणका ]
टपाल [ तल्प = टप्प (ल स्वार्थक ) = टपाल ]
बरें टपाल हंटलें = वरं तल्पं साधितं. टपाल म्हणजे बीभत्स मराठींत स्त्री. तल्प म्हणजे मंचक, खाटलें. त्यावरून खाटल्यावरील स्त्री. टपाल वाजविणें असाही प्रयोग आहे. टपाल वाजविणें म्हणजे बाज वाजवणें.
टप्पा [ अष्टपदी = अठ्ठपई = ठ्ठुपी = टप्पा असा परंपरेनें हा शब्द आला आहे ] (स. मं.)
टमकी [ स्थंभकिन् = टंम्हकि = टमकी = टिमकी ] स्थंभकिन् म्हणजे दोन्ही बाजूंनीं कातड्यानें मढविलेलें वाद्य.
टरकणें [ तर्क = टरक ] टरकणें म्ह• बुद्धि चंचळ होणें. (भा. इ. १८३४)
टरकन् पाद [ तर्क ] (धातुकोश-टरक १ पहा)
टरकन् फाड [ तर्क् ] ,,
टरबुज [ तरंबुज = टरबुज. तरत् अंबु = तरंबु (कर्क-धुवत् समास) तरंबुनि जातं तरंबुजं ] (भा. इ. १८३४)
टरारणें [ तरुणयति = टरारणें ] तरुणयति म्हणजे अतिशयें करून होणें. पुरी टरारून फुगली म्हणजे अतिशयें करून फुगली. ( भा. इ. १८३७ )