Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
झाडू १ [ हद् १ पुरीर्षोत्सर्गे ] ( धातुकोश-झाड ११, १२ पहा)
-२ [ जाहद्] (झाडा ४ पहा)
-३ [शाड् श्लाघायां हाजी हाजी करणें = झाडू] शाडुः = झाडू a low flatterer.
झांप १ [झंप (jump) = झांप ] (भा. इ. १८३५)
-२ [ झंपा = झांप ] झंपा म्ह० उडी.
-३ [ स्वाप = झ्वाप = झाप = झाँप = (डोळे) झांप, झांपड ] डोळे झांप = नेत्रस्वाप. झ्वाप असा उच्चार अशिष्ट अद्याप करतात. (भा. इ. १८३४)
झापड १ [ स्वापः = झापड ] डोळ्यावर झापड आली (धातुकोश-झापड पहा)
-२ [ स्वपथुः = झापड (निद्रा). स्वप् २ स्वप्ने] झापड म्ह० निद्रा.
झांपड १ [ स्वाप ] (झांप ३ पहा)
-२ [श्वापहेतिः ] ( धातुकोश-झांपड पहा)
झांपा [ झंपः = झांपा ]
झांबट [ संवर्तः = झांबट ] आभाळांत मोठें झांबट आलें आहे म्हणजे मेघांचा समूह आला आहे.
झालँ [ जाल्म = झालँ ] झालं ! एथें काय करावें ? = जाल्म ! किमत्र कार्य ? (भा. इ. १८३५)
झालर १ [ झल्लरी = झालर ] (भा. इ. १८३४)
-२ [ झल्लरी = झालर ] झल्लरी म्हणजे कुरळे केस. झालर म्हणजे कुरळ्या केसासारखें कापड.
झाला १ [ जे to decay. ज = झ ]
हा मनुष्य झाला आहे म्हणजे क्षीण आहे.
-२ [ यातः = जाअ + ल = जाला = झाला ] मे ग्राम: यातः = माझा गाव झाला (पाणिनि ३-४-७६)
माझा हा गाव झाला म्हणजे मी ह्या गावाला गेलों.
-३ [ ज्या ] (धातुकोश-झा पहा)
झाला-ली-लें-कृ, अस्, भू या तीन क्रियापदांच्या पाठीमागें कोणता ही शब्द लागून संयुक्त क्रियापद संस्कृतांत तयार होतें. तो च प्रकार मराठींत होतो.
सः गंगीभूतः = तो गंगा झाला. सः ब्रह्मीभूतः = तो ब्रह्म - झाला. ब्रह्म-झालेल्याला संसार कोठचा ? = ब्रह्मीभूतस्य कुतः संसार:
येथें मराठी वैय्याकरणंमन्य ब्रह्म याचें व्याकरण करूं जातात व त्या प्रयत्नांत गडबडतात. वस्तुत: ब्रह्मझालेल्याला हा एक शब्द आहे व तो संस्कृतापासून मराठीनें घेतला आहे. ब्रह्मीभूतः या शब्दांत ब्रह्मी या शब्दाचें जसें निराळे व्याकरण नाहीं, तसें च ब्रह्मझालेल्याला ह्या शब्दांत ब्रह्म या शब्दाला निराळें व्याकरण नाहीं.
ती स्त्री राजा झाली = सा स्त्री राजीभूता.
राजा झालेल्या स्त्रीस मुगुट घातला = राजीभूतायै त्रियै मकुटः दत्तः
येथें राजा हा शब्द निराळा करून व्याकरूं नये.
गाय झालेल्या लोकांस छठूं नये = गौभूतान् जनान् मा छलत ।
येथें गायझालेल्या हा एक शब्द आहे. गाय आणि झालेल्या असे निराळे शब्द करून परिस्फोट करूं गेल्यास घोंटाळा होऊन वाट सांपडणार नाहीं. (भा. इ. १८३६)