Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
चिचुंदरी [ छुछुंदुर (छुछु + उंदुर: ) = चिचुंदर-री ] (भा. इ. १८३३)
चिचुंद्री [ चंद्र नामधातू Freq चिचंद्र: नाम चिचंद्रिः = चिचुंद्री ] A shinning firework like the moon. चिचुंद्री ह्या शब्दावरून दिसतें कीं, दारू करण्याची कला frequentative रूपें भाषेंत चालू असतांना प्रचलित होती म्हणजे ही कला भारतवर्षांत फार जुनी आहे.
चिट पाखरूं [ चटकः, चिटिक: = चिडी = चिट ] चिट पाखरूं म्हणजे चिमणीसारखें क्षुद्र पाखरूं.
चिट्टी [ चिट् निरोप घेऊन पाठवणें. चिट्टिका = चिट्टी ] ( भा. इ. १८३३)
चिडणें [ चड् कोपे. डोकें चढणें = डोक्याचा कोप होणें = चिडणें, चढणें ] (ग्रंथमाला)
चित् [ स्वित् = चित् (हा अपभ्रंश जुना आहे )]
चिताड १ [चित्रान्नं = चिताण = चिताड ] सगळें पान चिताड करून उठला म्हणजे सर्व अन्नें चित्रविचित्र मिसळून उठला.
-२ [ चित्रं = चितरं = चितड = चिताड ]
चित्ताथिला [ चित्तान्वित + ल = चित्ताथिला ] विचारी.
चिस्ता वाघ १ [ चित्रकः व्याघ्रः = चित्ता वाघ ] चित्रकः चित्रकायः स्यात् उपव्याघ्रो मृगान्तकः ॥ राजनिघंटु ॥ (भा. इ. १८३७)
-२ [ चित्रकः = चित्तओ = चित्तो. चित्रक =चित्तअ = चित्ता ] चित्ता = चित्रविचित्र कातडें ज्याचें तो. (ग्रंथमाला)
चिंधी [ चिन्ह ( पताका ) = चिंध. लहान चिंध = चिंधी ] (ग्रंथमाला)
चिंब [ श्विंद् १ to be wet = चिंब ]
चिबूड १ [ चिर्भिट = चिब्भिड = चिबीड = चिबूड = फलविशेष ] (ग्रंथमाला)
-२ [ चिर्भटिका = चिबूड ]
-३ [ चिर्भटं = चिबूड ]
चिमकणें [ श्मीलनं = शिमळणँ = चिमळणँ = (वर्णविपर्ययानें) मिचळणें = चिमकणें (ळ बद्दल क) मिचकणें, मिचकावणें ] (भा. इ. १८३७)
चिमणी [ चीव् पासून चीवणी = चिमणी-णा-णें] (ग्रंथमाला)
चिमुटी [ मुचुटी = चुमुटी = चिमटी ] मुचुटी म्हणजे दोन किंवा तीन बोटांची मुद्रा.