Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश

चाँचा [ चंचा ( पाणिनि १-२-५२ ) = चाँचा ] चंचा म्हणजे कुपुरुष. चच्या हें नांव मराठींत आहे. सिंध प्रांतांत चचनामा म्हणून एक फारसी तवारीख आहे. तेथें चच या शब्दाचा चंचा या शब्दाशीं कांहीं संबंध असेल काय ? (भा. इ. १८३३)

चांचोड १ [ चंचूपुटं = चांचोड]

-२ [ चंञ्चूकोटि: = चांचोड ] चांचोड म्हणजे चोंचेचें अग्र.

चाट १ [ चट् to injure = चाट ] चाट लागला = नुकसान झालें.

-२ [ चृष्टिः = चाट ] इजा, नुकसान.

-३ [ चातयति. चातयतिर्नाशने इति यास्क: ( ६-३०) = चाट ] नाश, तोटा.

चाटणें [ चटनं = चाटणें ] स्पर्श करणें. अत्र पूर्णिमादिने समुद्रवेला चटति । पंचतंत्र-प्रथमतंत्र-कथा १२ (भा. इ. १८३५)

चाटळ [ चाटुलोल = चाटोळ = चाटळ = चाहाटळ ] चाटुलोल म्ह० थट्टेबाज. (भा. इ. १८३६)

चाड १ [ चते, चदे याचने. चति:, चदिः = चाड ] त्याला संसाराची चाड असेल म्हणजे विवंचना असेल.

-२ [ चातिः, चादिः = चाड. चत्, चद् याच्ञायां ] चाड म्ह० यांचा, गरज.

-३ [ चत्तिः चत् याच्ञायां = चाड ] (ज्ञा.अ.९)

-४ [ चाटु (स्तुतीची इच्छा) = चाड ] (भा. इ. १८३६)

चातुर - (सं.) चातुर म्हणजे शहाणा - हा शब्द मराठी लावण्यांत प्रियकरार्थक आहे. (भा इ. १८३४)

चांदकी [ चंद्रिका = चांदकी ] र्‍हस्वत्वदर्शक चांदुकली.

चांदवा [ चंद्रा, चंद्रिमा = चांदवा. चंद्रा canopy छत ]

चांदी [ चांद्री ( Moonlight पूर्णिमा) = चांदी ] ह्या दिवशीं मुसुलमानी अमलांत पगार वांटीत.

चांदोबा दाखविणें - दामोदरकराघातविव्हलीकृतचेतसा ।
दृष्टं चाणूरमल्लेन शतचंद्रं नभस्तलं ॥

चांदोबा दाखविणें म्हणजे उताणा पाडून मनुष्याच्या कानशिलांत अशी चपराक मारणें कीं, त्याला शंभर चंद्र दिसू लागावे, तिरमिरी येऊन. (भा. इ. १८३४)

चांधई [ चंद्रभित्तिः = चांदहिइ = चांधई ] चंद्रशाला शिरोग्रहं । घराच्या माथ्यापर्यंत जाणारी जी भिंत ती चंद्रिका. चंद्रभित्ति, चंद्रिकाभित्ति म्हणजे चांधई.