Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
गर [ गरः that which can be swallowed, eaten = गर. गृ to swallow. ) कोणत्या हि फळांतला खाण्या सारखा मऊ भाग.
गरज १. [ गृध = गरज. गृध्य = गरज्ज = गरज. गृध इच्छा, वांछा करणें ] गरज म्ह० इच्छा, वांछा. (भा. इ. १८३३)
-२ [गृद्य = गरज्ज = गरज ] (भा. इ. १८३४)
गरजू १ [गृधु = गरजू] इच्छा करणारा. (भा. इ. १८३३)
-२ [गृह्यक = गरज्जअ = गरजू] (भा. इ. १८३४)
गरती १ [गृहपत्नी = घरअत्ती = घरत्ती = गरती ] (भा. इ. १८३४)
-२ [गृहस्था = घरता = गरत = गरती] (स. मं. गोतवळा)
गरवस, गरवा [ गरीयस् = गरवस, गरवा ] उशीरां येणारें भात, पीक.
गरवें [ ( गुरु) गरीयस् = गरवें (भात) ] तयार होण्याला फार काल लागणारें भात. (भा. इ. १८३४)
गरा [ग्रहः = घरा = गरा] गरा हा मुखरोग आहे. (घरा पहा)
गर्दन १ [गर्द् १ शब्दे. गर्दनिः = गर्दन ] गर्दन म्ह० शब्द करण्याचा अवयव.
-२ [ हा फारसी शब्द आहे. ] (स.मं.)
गर्बा [ गर्भः = गर्बा ]
गर्मी - ह्या रोगाचा उल्लेख कौशिकसूत्रांत २७।३२ त केला आहे :- मुंचामि त्वेति ग्राम्ये पूतिशफरीभिरोदनम् । दारिल:, -ग्राम्यो व्याधिः मिथुनसंयोगात् पितादूरिति प्रसिद्धाभिधानः । (भा. इ. १८३२)
गलतान १ [ गलस्तनी = गलतान ] शेळीच्या गळ्यावरील थानाप्रमाणें निरुपयोगी माणसाला गलतान म्हणतात.
-२ [ गलस्तन: (बकरें) = गलतन = गलतान ] गलस्तन म्हणजे निरुपयोगी स्तनाकृति अवयव ज्याच्या गळ्याला आहेत तो प्राणी; निरुपयोगी प्राणी. (भा. इ. १८३७)
गलबत्या [गलवार्ता: = गलबत्ये] दृश्यन्ते चैव तीर्थेषु गलवार्ताः तपस्विनः ( पंचतंत्र-तृयीयतंत्र-कथा ३ )
गलबल [कल्+ वल्ह् किंवा वल् = गलबल; गल्+ वल्, कल् to make noise, वल्ह् to speak ]