Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश

गंधो गंधक आमोदे लेशे संबंधगर्वयोरिति विश्वः ।
पैकीं आमोद, लेश, संबंध हे तीन अर्थ मराठींत प्रचलित आहेत. (भा. इ. १८३६)

गंध (अल्पार्थक) [अल्पाख्यायां (५-४-१३६ पाणिनि) गंधः = गंध ] त्याला अक्षराचा गंध नाहीं म्हणजे अक्षराचें अल्प ज्ञान नाहीं. हा शब्द पाणिनीय कालापासूनचा आहे.

गधडा [गेहेधृष्टः bold at home, coward = गधडा ] a boastful, useless child.

गंधवाटी [गंधवर्ति = गंधवट्टी = गंधवाटी] (भा. इ. १८३२)

गपकन् १ [गृभ clasp = गपकन् ] graspingly.

-२ [ गृभ् = गप्] गपकन, धरणें.

गफलत [ग्लपतिः = गळपत = गपळत, गफलत ] फसवणूक, चूक.

गबर [ गव्हर = गब्भर ( पाली ) = गब्बर = गबर] (भा. इ. १८३२ )

गबरू [ गर्भरूपक (पोर, मुलगा ) = गबरू ] ए गबरू ! कोठें गेला होतास, येथें लेका ! पोरा ! या अर्थी गबरू शब्द योजलेला आहे.

गबाळ [ गोबाल (गाईचे केस) = गबाळ ]

गम् [ अगमत् = गमणें. अगछत् = गचणें.] ( भा. इ. १८३४)

गम १ [गम ( अविचार ) = गम ] (भा. इ. १८३४)

-२ [ आ + गम् ( आागमेः क्षमायां )] आगमयस्व तावत् = गम तर खा थोडी. गम म्हणजे क्षमा. मी थोडीशी गम खाल्ली म्हणजे क्षमा केली.

गमणें [ गम्ब् = गम्बति. गम्बन = गम्मण = गमणें ] वेळ घालवणें. (भा. इ. १८३४)

गमे [ गम्यते = गमे (कर्मणि ) ] गमे म्ह० समजे. मज गमे = में गम्यते. (भा. इ. १८३४)

गयावया - गयावया हा शब्द प्राकृत गअवइ शब्दापासून निघाला आहे. गयावया ह्या शब्दाचा मराठींत अर्थ निराश्रित असा आहे. प्राकृत गअवइ शब्दाचें संस्कृत रूप गतपतिका आहे. ज्या स्त्रीचा नवरा गेला आहे तिला प्राकृतांत गअवइ म्हणत. गतपतिकेप्रमाणें दिसणार्‍या व वावरणार्‍या निराश्रित माणसाच्या कृतीला अनुलक्षून गयावया हा शब्द योजतात. (स. मं. श्रावण १८२६)

गयावळ [ गयापालकः = गयावळ.
प्रयागपालकं: = प्रयागवळ. ]