Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश

कडबू [करंभः = कडंबो = कडवू] पक्वान्नविशेष.

कडबोळें [कटकवलयं= कडअबळअँ=कडबोळें. अ=ओ] हातांतील कड्याच्या वळ्यासारखा खाद्य पदार्थ.

कंडरा [ कंधरा = कंडरा (गळ्याचा दोर) ] कंघरा = कंडरा ( मान ) (भा. इ. १८३६)

कडवट [कद्+ वद् १ व्यक्तायां वाचि. कद्वद: = कडवट] तो मुलगा कडवट आहे म्ह० कुत्सितभाषाक आहे. (धा.सा.श.)

कडा [ कटक = कडअ = कडा ( डोंगराचा ) ] (भा. इ. १८३३)

कडाड [ कर्दट = कडाड] वीज कडाडली (कडकड पहा)

कडाका [ कटाक्ष शब्दाचें प्राकृत कडक्ख, त्याचें मराठी कडाखा, कडाका ] ज्या लावणींत किंवा पद्यांत कोणत्याही विषयावर विशेष कटाक्षानें बोलणें असतें त्या लावणीला कडाख्याची लावणी म्हणतात. (स. मं. )

कडियाळ [ कटकालयं = कडियाळ, कड्याळ (कडें ) ornament ]

कडी १ [काष्टिका = काडी = कडी ]

-२ [ कटि: = कडी, कड] (शा. अ. ९ पृ. ६४)

कडीपाट [ काष्टिकापट्ट: ]

कडे [ कक्ष = कड = कडे (चतुर्थी, सप्तमी) कडून, कडचा, कडां] (ग्रंथमाला)

कडें [ कडकं ( वर्तुल ) = कडअँ = कडँ = कडें ( सोन्यारुप्याचें वगैरे )] (भा.इ. १८३३)

कडेपोट [ कटिप्रोथ = कडेपोट ]

कडेवर [ कटिः ककुद्मतीं श्रोणी नितंबश्च कटीरकं ॥ राजनिघंटुः ॥ कटीरक = कटीकर (वर्णविपर्यास) = कडीअर = कडीवर, कडेवर. कटीरके गृह् = कडेवरी घे, कडेवर घे. येथें कडेवर ही सप्तमी आहे ] कडेवर घेणें म्हणजे नितंबावर घेणें. (भा. इ. १८३७)

कडेसर, कडोसर [ कटिशीर्षक (hollow above the hips or loins वैजयंती कोश) = कडेसर ] कडेस्त्रीला सुपारी खोवणें.

कडोस्त्री [ कटिवस्त्र ] कडोस्त्रीस पैसा = कटिवस्त्रे द्रव्यं.

कड्याळ [ कटकालयं ] (कडियाळ पहा)

कढकढीत [ क्वथ् १ निष्पाके (द्विरुक्त) ] (धातुकोश कढकढ पहा)

कढी [ क्वथिका = काढआ = कढी ]

कणकण [ कण् शब्दे ] (ग्रंथमाला)