Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश

कंठणें, कठणें [कठ् कृच्छ्रजीवने । कठन = कठणें, कंठणें] (भा. इ. १८३३)

कंठनाळ [ कंठनाल = कंठनाळ ] (स. मं. )

कंठाळ १ [ कंथालि: ]

-२ [ कंठतलासिका = कंठअल = कंठाळ. असिका हें पद गळालें ] (भा. इ. १८३३)

कड [ कटि = कड] (स. मं.)

कंड १ [कड् मदे. कंड: = कंड ]

-२ [ कडि मदे = कंडा = कंड ] कंड सुटणें म्ह० माद चढणें.

-३ [कंडूय्]

-४ [ कंडू = कंड ] (भा. इ. १८३४)

कडक १ [कर्कर ( hard ) = कडक ( र लोप ) ] ( भा. इ. १८३६ )

- २ [कड्डक = कडक. कड्ड् कार्कश्ये । कडक म्ह० कर्कश. तो कडक मनुष्य आहे म्ह० कर्कश माणूस आहे.

कडकड [ कर्द् १ कुत्सिते शब्दे. प्रकर्द = पकपक आवाज करणें. द्विरुक्ति = कडकड. वीज कडकडली. कर्दट = कडाड. वीज कडाडली ]

कडकडित १ [ कड् to saperate, tear = काढणें ] चिरटोळा काढणें to tear a leaf.

-२ [क्कथ् = कडकडित पाणी boiling water ]

-३ (कड्ड् to be rough कडकडित पापड rough पापड ]

-४ (कड् to be elated and intoxicated = कडकडून भेटणें. to warmly receive ].

कडकडीत [ कड् १ मदे, वैक्लव्ये (द्वित्त) ] (धातुकोश-कडकड ३ पहा)

कडकडून [ कड्] (कडकडित ४ पहा)

कडकन् [ कड् १० भेदने ] (धातुकोश-कडक ३ पहा)

कडंगर [ (सं.) कडंकर किंवा कडंगर (पेंढा वगैरे) ] (भा. इ. १८३३)

कडगुलं [ कटक + (स्वार्थक) ल = कडगुल ] कडगुल म्ह० लहानसें कडें.

कडदर-कडदोर-कडदोरा [कटित्र= कडतर = कडदरदोर-दोरा ] कटित्र म्हणजे कटीचें रक्षण करणारी वस्तु. (भा. इ. १८३४)

कडदोरा [ कटित्रं = कडितर = कडदर = कडदोरा]

कडधान्य [ कृष्टधान्यं ]