Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश

सउरा [ शकुलः = सउरा, सौरा ] ( भा. इ. १८३६ )

सकट [ सकृत् ] बरोबर, together. (सगट पहा)

सकत [ संशक्त = सकत ] Powerfull ( अशिष्ट )

सकलाद - हा शब्द फारशींत सगलाद असा आहे. इंग्रजीत scarlet असा आहे. इटालियन भाषेंत Scarlatto; तुर्की iskerlet; फ्रेंच Scarlate असा आहे. मूळ कोणत्या भाषेत हा उत्पन्न झाला तें सांगतां येत नाहीं. Scarlet म्हणजे एका प्रकारचें Broad-Cloth. Scarlet या रंगाशीं या शब्दाचा कांहीं संबंध नाहीं. चिनी भाषेत Sakala म्हणजे एका प्रकारची silk-brocade, मराठेशाहींत सकलादी अफगानिस्थान, इराण व यूरोप या देशांतून महाराष्ट्रांत येत. येथें होत नसत. त्या अर्थी हा शब्द परदेशी आहे असें दिसतें. बहुश: फारशी सगलाद शब्दावरून आला आहे. इंग्रजी scarlet हा हि शब्द फारशी सगलादवरून च घेतला असावा. एक r मध्यें घुसडून दिला आहे. हा इंग्रजी बोलण्याचा स्वभाव हि आहे. ( भा. इ. १८३२ )

सकारणें [ सत्कृ = सकार ( णें ) ] (भा. इ. १८३६)

सकाळ १ [ सत्काल = सक्काळ = सकाळ ] उत्तम शुभ काल तो सकाळ, संध्याकाळ हा शब्द पुल्लिंगी व स्त्रीलिंगी आहे. त्याच्या च धर्तीवर सकाळ हा शब्द हि पुल्लिंगी व स्त्रीलिंगी होता. संध्याकाळ ह्या सामासिक शब्दांत संध्या हा शब्द स्त्रीलिंगी तरी आहे. परंतु सत्काल ह्या शब्दांतील सत् स्त्रीलिंगी नाहीं. तेव्हां केवळ संध्याकाळ ह्या शब्दाच्या अनुकरणानें सकाळ हा शब्द स्त्रीलिंगी मानला गेला आहे. मला सकाळ झाली. सकाळ झाला. संध्याकाळ झाली. संध्याकाळ झाला. दुपार झाला. दुपार झाली.
(भा. इ. १८३३)

-२ [ सकालम् early in the morning = सकाळ, सकाळीं ] early in the morning

सक्त [ असक्तं ( त्वरितं ) = सक्त ( अलोप ) ( क्रियाविशेषण, अव्यय ) ] त्यानें सक्त मेहनत केली = सः असक्तं उद्यतः

सगट [ सकृत् ( together ) = सकट = सगट ] बरोबर, together. छत्रीसगट = छत्रीसुद्धां. सरसगट = सर्वसकृत् ( भा. इ. १८३३)

संगवई [ संवयस् = संगवई ] compassion.

सगा [ सखा = सगा. सखासोदरक = सगासोयरा] (स. मं. )

सगा सोयरा [ सखा सोदरक ] ( सगा पहा)