Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
शाडू [ शाद: (कर्दमः ) = शाडू ]
शाण [ छगण ] ( शेण पहा)
शानदार १ [ सान्द्रं ] (छानदार २ पहा)
-२ [ सान्द्र ] (छानदार ३ पहा)
शांदार [ सांद्र ] (छानदार ३ पहा)
शाहजोग [ साधुयोग्य = साहुजोग = शाहजोग ]
वाटेल त्या सीध्या माणसास मिळणारी हुंडी.
शाहाळें [ शालूकं ] ( शाळे पहा)
शाळू १ [ शीतालुः = शिआळू= शाळू. शीतं न सहते शीतालुः ] शाळू सोबती म्हणजे कष्ट मेहेनत ना सोसणारे स्नेही.
-२ [ शयाळु = श्याळु = शाळू ] (भा. इ. १८३४)
शाळें [ शालूकं = शाळें, शाहाळे. हाकार उच्चारसौकर्यार्थ ] नारळाला* शाळें, शाहाळें म्हणतात.
शिकंदर - हा फारसी शब्द अलेक्सेंदर या ग्रीक शब्दापासून निघाला आहे हें सांगावयाला नको च. निघण्याचा प्रकार असा - अलेक्सेंदर = अलेक्सिंदर = कसिंदर = सिकंदर = शिकंदर.
अले = अल् अरबी आर्टिकल झालें; व अलसिकंदर असा शब्द बनला. पैकीं अल् हें आर्टिकल उडून नुसता सिकंदर शब्द राहिला. पुरातन शिलालेखांत अलिकसुंदर असें संस्कृत रूप या शब्दाचें आढळतें. नशीब शिंकंदर अशी म्हण फारसींतून मराठीत रूढ झालेली सर्वांना माहीत आहे च. (भा. इ. १८३२ )
शिंकणें [ शृंख् ( शिकणें ) = शिंक ( आपस्तंबीय धर्मसूत्र ) ] ( भा. इ. १८३४)
शिकरण [ शिखरिणी = शिकरण (केळ्यांची वगैरे) ] (भा. इ. १८३४)
शिंकरणें [सिंघाणकरणं = शिंखाणअरणँ = शिंकारणें = शिंकरणें ] शिंकरणें म्हणजे नाकांतला मळ काढणें. ( भा. इ. १८३६)
शिकरी [ शिक्यराजिः = शिकराई = शिकरी. शिक्यरज्जुः = शिकराई = शिकरी ] रहाटाच्या घडमाळेच्या शिंक्यांचा दोर.१
शिंका [ छिक्का = शिंका ( अनुस्वारीकरण ) ] ( भा. इ. १८३३ )
शिखर [ शीर्ष = शिखर (र व प यांचा व्यत्यास ) ] शिखर म्हणजे डोकें.