Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
श
शपत् [ शंवत् ( अंतःकरणे, अभिमुख्ये ) = शपत् ( निपात ) ] येईल तर शपत् इत्यादि वाक्यांत हा निपात मराठींत आढळतो. (भा. इ. १८३४)
शंभरावा [ शततमः = शंभरावा. त्रिंशत्तमः = तिसावा. दहावा, नववा इ. ]
शरम [ श्रम् ४ खेदे. श्रमिः = शरम ] ( धा. सा. श. )
शरमणें [ श्रम् तापे खेदेच । श्रम = शरम ] त्याला शरम वाटली = त्याला खेद वाटला. फारसी शरम शब्द मराठींत स्त्रीलिंगी असल्यामुळे हा प्राकृत शरम शब्द हि स्त्रीलिंगी झाला आहे. ( भा. इ. १८३३ )
शारिर [ शरीर ( सं. ) = शरिर ] (स. मं.)
शर्य्यत [ श्वर्त् गतौ श्वर्तिः = शर्यत ] race. फारसी नाहीं.
शहाण १ [ शिक्षाज्ञ = सिहाणु = सिहाण ( णा-णी-णें ) = शहाण ( णा-णी-णें ) ] सिहाण शब्द ज्ञानेश्वर व दासोपंत योजतात. (भा. इ. १८३२ )
-२ [ विचक्षणवतीं वाचं वदेत् (ऐतरेय ब्राह्मण ) वेदकालीं कोणालाही कांहीं काम सांगतांना असे शब्द योजीत :-
" देवदत्त, विचक्षण, गां आनय ” म्हणजे देवदत्त या संबोधनापुढें विचक्षण हें विशेषण उच्चारीत. (विचक्षण) चक्षण = सहण = शहाण (णा-णी-णें). देवदत्ता, शहाण्या, गाय आण ] हा प्रयोग सध्यांही आपण मराठींत करितों. ( भा. इ. १८३४)
-३ [ सज्ञानः = सयाणा = शहाणा ] व्रजभाखेंत सयाने (शहाणा) असा अपभ्रंश आहे.
शहारा [ सीत्कार: = सीयारा (ज्ञानेश्वरी ) = शहारा ] shivering.
शा - ( सा २ पहा)
शाई [ श्यावा = श्याई = शाई. शामिका = शाइआ = शाई ] शाई म्हणजे काळा रस हा प्रथन अर्थ. नंतर कोणत्याहि रंगाच्या लिहिण्याला योग्य अशा रसास शाई हें नांव पडले. ( भा. इ. १८३४ )