Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
बोचकभवानी १ [ व्यवसायभवानी = बोचकभवानी ] उद्योगी बया.
-२ [ मूपकभवानी = बूचकभवानी = बोचकभवानी ] भवानी deity of the मूषकs c. e. robbers.
-३ [ मुंच् १ गर्वे. मुंचक = बुंचक = बोचकभवानी ] गर्विष्ठ फसवी मुलगी.
सहाव्या गणांतील मुच् मुंच् निराळा. (धा. सा. श.)
बोचका [ व्यंसक ( cunning ) = बोचका ]
बोचणें [ व्युष् ४ विभागे. व्योषणं = बोचणें ] ( धा. सा. श. )
बोंचणें [ कर्मणि व्रूस्यते = बोंचतें ( अकर्मक ) व्रूस् इजा करणें हिंसायाम्. व्रूसयति = बोंचतो (सकर्मक)] ( भा. इ. १८३६)
बोचरा १ [ व्युच्चारकः = बोचरा] व्युच्चारक म्हणजे सीधा मार्ग सोडून वर्तन करणारा.
-२ [ व्यच्चरक going astray, adulterous = बोचरा, भोसडा ] adulterous व्युच्चर्यः = भोसडिच्या adulterous.
बोचा १ [ बुस् उत्सर्गे. बोसः = बोचा ] बोचा म्हणजे उत्सर्ग करण्याचें इंद्रिय. ( धा. सा. श.)
-२ [ मुंचक = बुंचा = बोचा ]
मुंचक म्हणजे अंड, आंड.
बोचा म्हणजे अंड.
-३ [ बुसः the organ that voids offal = बोचा. बुस् to omit, to void. ]
बोज [ ओजस् = वोज = बोज ]
बोजड [ व्यायत, व्युद्यत = वोजड ] बोजड म्हणजे आकाराबाहेर आडवेंतिडवें लांबलचक.
बोजा [ अवोह्य: ( अव + उह्य ) = बोजा ]
पोट १ [ पोत = वोट = बोट ] नाव. इंग्रजींत हि boat असा च शब्द आहे. आगबोट = अग्निपोतः
-२ [ चिंचेच्या बोटाप्रमाणें ज्याची आकृति दिसते तो अवयव. पुट = पोट = बोट ] (स. मं.)
बोंड [ वृंत = बोंड ] वृंत म्हणजे स्तनाग्र. बोंड म्हणजे स्तनाचें अग्र, कळीचें आग्र, कश्याचें हि अग्र.
बोडक [ वर्धक = वडुक = बोडक (का - की - कें ) ] वर्धक म्हणजे कापलेलें, केंस कापलेलें. जिचे केंस कापले किंवा काढले किंवा भादरले आहेत ती बोडकी.
ज्याच्या डोक्यावरती केसांचें किंवा वस्त्रांचें आच्छादन नाहीं तो बोडका.
ज्याच्यावरतीं कुसळांचें अच्छादन नाहीं तें बोडक्याचें भात. (भा. इ. १८३४)