Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
बृहस्पति - बृहस्पति म्हणजे नास्तिकशिरोमणि.
हा मुलगा मोठा बृहस्पति आहे म्हणजे नास्तिक आहे, अद्वातद्वा बोलणारा आहे.
बेंगरूळ [ व्यंगरूप = बेंगरूअ. बेंगरूअ + ल (स्वार्थक) = बेंगरूअल = बेंगरूळ ]
तो मनुष्य बेंगरूळ आहे म्हणजे रूपानें व कृतीनें व्यंग आहे. ह्या शब्दाचा बंगळूर या नगरवाचक शब्दाशीं कांहींएक संबंध नाहीं. (भा. इ. १८३४)
बेघाट [ विघाट = वेघाट ] (भा. इ. १८३६)
बेचंगळ [ बीच + अंगुलि ] बोटांमधील भाग. (स. मं.)
बेचा [ वयस्या, वयस्यः ] (बेची पहा)
बेचाळी [ पीचालिः = बेचाळी, बचेळी ] पीच म्हणजे खालचें जाभाड.
बेची [ वयस्या = बइच्चा = बेचा, बेची. वयस्यः = बइच्चा = बेचा ] बेचा व बेची हीं दोन मराठींत आवडतीं नांवें आहेत. (भा. इ. १८३४)
बेजार [ विज्वर = बिज्जर = वेजर = वेजार. विशिष्टः ज्वरः
विज्वरः ] चिंताविज्वरः = चिंतेनें बेजार. (भा. इ. १८३४)
बेट [ वेष्ट् १ वेष्टने, वेष्ट = बेट ] बेट a place surrounded by water. ( धा. सा. श. )
बेटा १ [ द्विता (वैदिक) खरोखर या अर्थी. द्विता=वीटा = बेटा] काय बेटा झालें = किं द्विता संवृत्तं ? (भा. इ. १८३४)
-२ [ वृथा in vain = बेटा, बिटा ] तो बेटा मेला = स वृथा मृतः he died in vain, to no purpose.
-३ [ विथक् (शैघ्र्ये) = विठअ = विटा, वेटा (टा-टी-टें)] बेटा म्हणजे जलदीं, शीघ्र.
बेट्या [ वीट + क = बीट + अ = बीटा = बेटा (Lad) =बेट्या. विटिका = बेटी ] अरे वीट्या असा हि उच्चार करितात. (भा.इ. १८३३)
बेडूक १ [ भेकमंडूक =वेअअंडूक = बेडूक ]
-२ [ मंडूक = बेडूक. मंडूकतरी = मंडोदरी female frog ]
बेडें [ वितर्दिः = बेडी, बेडें] अंगणांतील गुरें वांधण्याचा गोटा.
बेंड्या [ द्यंडक: = बेंड्या ] (बिंडा पहा)
बेताल [ वितालं ] (वेताळ पहा)