Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश

पुता-ती-त [पुत्रक = पुतअ = पुता-ती-त] (स. मं.)

पुत्र [ पुत्र = पुत्र, पूत ] ( स. मं. )

पुरण [ पृच् to mix. पृग्ण mixed (Vaidik)= पुरण ( mixture ) मिश्रण ] पुरणाच्या पाटल्या म्हणजे सोन्यांत इतर धातूंचें मिश्रण करून केलेल्या पाटल्या.

पुरमाशीण [ पूर्णमासिनी = पुरमाशाण ] पूर्ण महिने झालेली गर्भारीण.

पुरवठा [ पूर्यवंट: = पुरवटा, पुरवठा ]

पुरवणें [ पुर्व् पूरणे. पुर्वणं = पुरवणें ] पिछा पुरवणें म्ह० पाठलाग पूर्ण करणें. (धा. सा. श.)

-२ [ पृ १० पूरणे = पुरवणें ] शक्ति असणें. कोणाला हि जातां पुरवत नाहीं = केनापि गंतुं न पार्यते. ( धा. सा. श.)

पुरुष १ [पुरुष म्हणजे नवरा असा अर्थ मराठींत आहे. आमचे पुरुष घरांत नाहींत ह्या वाक्याचा अर्थ माझा नवरा घरांत नाहीं असा आहे. हा अर्थ मराठीनें संस्कृतापासून घेतला आहे.
त्वं मम भार्या भव अहं तव पुरुषो भवामि । आश्वलायन गृह्यसूत्र-गार्ग्य नारायणीयवृत्ते-१-६-१ ] ( भा. इ. १८३६)

-२ [ पौरुष (मस्तकावर सरळ वर हात केलेल्या पुरुषाची उंची) = पुरुष ]
ही विहीर सात पुरुष खोल आहे, येथें पुरुष म्हणजे विवक्षित उंचीचें मान आहे व हा पुरुष शब्द संस्कृत पौरुष शब्दापासून निघालेला आहे. प्राकृतांत येतांना संस्कृत शब्दांतील वृद्धि काढून टाकण्याचा प्राकृताचा व मराठीचा स्वभाव आहे. संस्कृत भाववाचक नामें मराठींत व प्राकृतांत अपभ्रष्ट होतांना हा विकार दृष्टीस पडतो. पौष = पूस इ. इ. इ. (भा. इ. १८३७)

पुरुषात्कार [ पुरुषकारः = पुरुषात्कार (साक्षात्काराच्या सादृश्यावरून ) ] हा शब्द मी आमच्या मातुःश्रींच्या तोंडून फार वेळां ऐकिला आहे.

पुरेपूर १ [ पुरु पुरु ( much ) = पुरेपूर, पुरु वैदिक आहे) exceedingly, पुष्कळ.

-२ [ पुरुहं + पूरु = पुरोपुर = पूरेपूर ] पुरुहं व पुरु ह्या दोन्ही शब्दांचा अर्ध पुष्कळ असा आहे. एकार्थक दोन शब्द जोडून अतिशय दाखविलेला आहे. (भा. इ. १८३५)

-३ [ परिपृ (परिपूरं) = पुरेपूर ] Filled to the brim.

-४ [ पुरुहूः पुरु: = पुरेपूर ] पुरुहू व पुरु या दोन्ही शब्दांचा फार (स्फार) असा अर्थ आहे. बाहुल्यार्थ द्विरुक्ति.

-५ [ पुरेपूर दूध प्यालों, ह्या वाक्यांत पुरेपूर म्हणजे पुष्कळ. वैदिक शब्द पुरु. त्याची द्विरुक्ति पुरुपुरु. पुरु म्हणजे पुष्कळ. पुरुपुरु म्हणजे सडकून पुष्कळ. पुरुपुरु या शब्दाचा अपभ्रंश पुरेपूर ] (भा. इ. १८३३)