Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश

-२ [अद्धा evidently = आता ]

आतां [ आतः इतोपीत्यर्थे ( तत्त्वबोधिनी ) ] आतां काय म्हणतोस = इतोपि किं भणसि, आतः किं भणसि. आतः=आता, आतां. अनुनासिक वैकल्पिक. (भा.इ. १८३४)

आताँ - धर्मपालकृत पाइअलच्छी नांवाच्या प्राकृत कोशांत खालील शब्द आतां ह्या अर्थी आहेत:-
इहइँ संपइ इण्हिं इत्ताहे संपयं दाणिं ॥ ६७ ॥ पैकीं इत्ताहे हें आतां ह्या अर्वाचीन शब्दाचें प्राकृत रूप होय. इत्ताहे = इत्ता = आत्ता = आतां. रोजच्या बोलण्यांत लोक आत्ता असा उच्चार करतात. आतां ह्या अर्थी दाणिँ शब्द ज्ञानेश्वरकालीन मराठींत येतो, त्याचें मूळ इदानीम्. (स. मं.)

आंता ! [हन्त (come ! ) = आंता ! ] आंता कसें करूं = हन्त किं करवाणि.

आतां काँ [ अथ कीं = आतां काँ ( How else ? ) ] (भा. इ. १८३३)

आते [ आप्तका ] ( आत्या पहा)

आतें [ असत् = आत (ता-ती-तें) असणारें. असचें वर्तमान धातुसाधित असत् = (अलोप) सत्. मराठींत अ राहिला आहे.]

आंतौरिया [ अंत:पुरिका ] अंत:पुरांतील स्त्री. (ज्ञा. अ. ९ पृ. १२८ )

आत्या १ [आप्तका = अत्तिका = अत्तिआ = अत्या = आत्या, आत, आते ] बापाची वडील किंवा धाकटी बहीण. ( स. मं.)

-२ [ आप् व्याप्तौ. आप्तिका ( आप्तचें स्त्रीलिंग) = आत्तिका = आत्या ] आत्या म्ह० आप्त स्त्री, बापाची बहीण, वडील बहीण इ. इ. ( धा. सा. श. )

आथिला [ आप्रथित + ल ] ( धातुकोश-आथ १ पहा)

आदळणें [ आ + दल् (हापटणें) = आदळ ] (भा. इ. १८३४)

आदा [ आदा ( स्री ) = आदा (घेणें ) ]
आंदू-हात्तीच्या पायांत तो स्थिर उभा राहावा म्हणून आंदू घालतात-अदि बंधने । अदित आंद: बंधनकर्ता. तीर्थेभ्य अन्दं. ( मां. वा. सं. ३०-१६ ) ( भा. इ. १८३३)

आदोगर [ आदावग्रे = आदोगर ] आदौ म्ह० अग्रे, पहिल्याप्रथम. आदावग्रे हे शब्द संस्कृतांत जोड योजतात. ( भा. इ. १८३६)

आधमणी [ अर्धमानिका = आधमणी ( स्त्री ) ] माप, वजन. ( भा. इ. १८३४)