Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
निवर्तणें [ वृत् १. निर्वर्तनं - निवर्तणें ] मरणें. (भा. इ. १८३६)
निववणें [ वप् १ बीजसंताने. निर्वापणं = निवावणें = नववणें ] डोळे निवव = चक्षुषी निर्वापय. (धा. सा. श.)
निवळ १ [मल् ११. निर्मलनं = निवळणें. निर्मल = णिम्मल = निव्वळ, निवळ, निवळणें ] ( धा. सा. श.)
-२ [ निर्मलं = निव्वळ = निवळ ] निर्मलं वारि = निवळ पाणी.
निवाड [ निर्वादक = निवाड (निवडणारा) ] (ज्ञा. अ. ९ पृ. १८२)
निवाडा १ [ निर्णयपादः ( फैसल्ला ) = निवाडा ] Final Judgment.
-२ [ निर्वादः ] (ज्ञा. अ. ९ पृ. ३३)
निवांत [ निवातं ] ( ज्ञा. अ. ९ पृ. २० )
निवेद १ [ ( न्यदः ) निध्यद = निवेद ( अन्न ) ] (भा. इ. १८३४)
-२ [ नैवेद्य offering of food to God = निवेद ] निव्वळ [ निर्+ मल् ]
निशणा [ निकषनः = निहसणः = निसणा, निशणा ]
निशाण-दुंदुभि [निःसाण = निशाण]
ज्ञानेश्वरींत निशाण शब्द येतो. त्याचा अर्थ नगारा, दुंदुभि. हा निशाण शब्द निःसाण शब्दाचा अपभ्रंश आहे. पताका या अर्थी फारशी निशान, निशाण म्हणून जो शब्द आहे त्याचा नगारा ह्या अर्थाच्या निशाण शब्दाशीं कांहीं एक संबंध नाहीं. मराठी पोवाड्यांत " घाव घाला निशाणा ” असें एक वाक्य येतें, येथें "नगार्यावर टिपरूं मारा" असा अर्थ विवक्षित आहे. ( स. मं. )
निशिलें [ निशित + ल ] ( धातुकोश-निस ३ पहा )
निष्क [ निष्क् १० परिमाणे, to weigh ]
१ निष्फ = २ सुवर्ण = ३ कर्ष ( १६ मासे = माषाः ).
४ कर्षाषण = १६ मासे.
५ { सुवर्ण कार्षाषण.
६ { रौप्य कार्षाषण.
७ टंक.
८ द्रम्म ( द्रम् to go ).
९ पण, पाण, पाणक (आणक).
१० नाणक.
११ काकिणी.
१२ कपर्दिका.
१३ वदाम = २ दान.
१४ गद्यान.