Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
नारू [ नहारु (पाली ) + ण्हारू (जैनमहाराष्ट्री ) = नारू (रोगविशेष). पालींत नहारू = स्नायु] स्नायूच्या वेटाळ्यासारखा ज्या कृमीचा आकार तो नारू. (भा. इ. १८३२)
नाला [ नालः = नाला ]
नावारूपाला येणें - "तो मनुष्य नावारूपाला आला" ह्या वाक्यांत नावारूपाला म्हणजे योग्यतेला असा अर्थ आहे. हा अर्थ नावारूपाला येणेंप्रमाणें आला. प्रशंसायां रूपं (४-३-६६ ) असें पाणिनीचें सूत्र आहे. सुबंत किंवा तिङन्त शब्दापुढ़ें रूप हें पद लागून तो शब्द प्राशस्त्यार्थी होती. जसें, पटुरूपः म्हणजे प्रशस्तपणें पटु-चांगला कर्तबगार. तसेंच, नाम ह्या शब्दाला रूप लागून नामरूप शब्द झाला. अर्थ चांगलें, प्रशस्त, स्तुत्य नांव ऊर्फ कीर्ति. नामरूप ह्याचें मराठी नावरूप. चतुर्थीचा ला प्रत्यय लागतांना नांव हा शब्द तसाच रहातो किंवा रूपशब्दाप्रमाणें आकार घेतो. नावरूपाला किंवा नावारूपाला. (भा. इ. १८३२)
नावेक १ [ अन्हायक (अकच्) नावक = नावेक ] नावेक म्हणजे लौकर. (भा. इ. १८३६)
-२ [ नव्यकं ] ( ज्ञा. अ. ९ पृ. ४९ ) हा शब्द जुन्या मराठी ग्रंथांत फार येतो. अन्हाय म्हणजे लौकर. ( भा. इ. १८३६ )
नासका [ नासकः = नासका. नस् कौटिल्ये ] तो नासका माणूस आहे म्हणजे कुटिल, वक्र आहे. नासका कुचका असे शब्द मुली उच्चारितात.
नासा [ स्नासा ] ( धातुकोश-नसनस पहा )
नासिका [ स्नासिका ] ,, ,,
नाहक १ [ अनागस् = अनाकह = नाहक (निरपराधी )]
त्यानें त्याला नाहक मारिलें = तेन सः अनागास् मारितः ।
क व ह याचा विपर्यय. फारसी नाहक्क शब्द निराळा. ( भा. इ. १८३४)
-२ [ अनाहतक: = ( अ लोप ) नाहअक = नाहक ]
अनाहतोऽपि विदीर्णहृदयः = नाहक दुःखी.
नाहि [ ननु हि = नाहि ] नाहि, असें पहा, ह्या वाक्यांत नाहि हें अव्यय संशय किंवा प्रश्न किंवा अवधारणा दाखवितें.
नाही १ [ नभ्] ( धातुकोश-नह पहा)
-२ [ नहि = नाही ]
मी गेलों नाहीं = अहं नहि गतः अस्मि
मी जाणार नाही = अहं नहि गंतास्मि
तो जाणार नाही = सः नहि गंता ।
ते जाणार नाही = ते नहि गंतार:
मराठींत ते जाणार नाहीत, असें हि म्हणतात. परंतु, तें एका प्रकारें अशुद्ध आहे. तात्पर्य, नाही हें अव्यय आहे. (भा. इ. १८३६)
-३ [ नव्हे पहा ]