Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
नागदवणा [ नागदमनी = नागदवणा ] (भा. इ. १८३४)
नांगरटी [ लांगल पद्धति = नांगरवढ्ढई = नांगरोटी = नांगरटी ]
नांगर्या १ [ लांगलग्रह: (वार्तिक ३-२-९) = नांगर्या ] one who works with the plough.
-२ [ लांगलिक: = नांगरिआ = नांगर्या ]
-३ [ लांगलग्रहः = नांगरआ = नांगर्या (शेतकरी ) ]
नागा [ नह + गा ( जाणें) = नागा ] नागा म्हणजे जाण्यास प्रातिबंध, खाडा, खळ.
नाचण [ स्नसनः = न्हाचण = नाचण. स्नस् निरसने, to eject ] नाचण म्ह० न्हाव्याचें कांटा काढण्याचें यंत्र.
नाट १ [ नष्ट = नाट ] हरवलेली वस्तू.
-२ [ नष्टिः, नष्टं = नाट] नाट लागला म्हणजे हेतु नष्ट झाला.
-३ [ नाष्ट्यं = नाट ] नाट म्हणजे अदर्शन, लेप. नाट लावूं नको म्हणजे वस्तूचा अभाव होईल असें बोलूं, करूं नको.
नाटकी [ नाटकीयः = नाटकी ]
नाटकीयो नृत्तकरः इति अजयः ।
नाट्या [नाष्टिकः = नाट्टिआ = नाट्या ] नाष्टिक म्हणजे हरवलेल्या वस्तूचा धनी, अपेशी माणूस. नाट्याचें तोंड सकाळीं पाहूं नये म्हणजे अपेशी माणसाचें तोंड सकाळीं पाहूं नये.
नाठाळ १ [ अनास्थालु = नाठ्ठालु = नाटाळ, नाठाळ ] ( भा. इ. १८३६)
-२ [ अनास्थ = अनाठ्ठ + आल = नाठाळ. प्रारंभींच्या अचा लोप ] (भा. इ. १८३२)
-३ [ नाथालु ] (नाद पहा)
नाडणें १ [ नाडयति ] (नडणें पहा)
-२ [ नाथ्, नाध् उपतापे = नाडणें ] (भा. इ. १८३६)
नाडा १ [ नाद्धिः = नाडा ]
-२ [ नध्नी ] (नाडी १ पहा)
नाडी १ [नध्नी = नाडी, नाडा ]
-२ [ नदध्री = नाडी ( दोरी ) ]
नाणें १ [ नामांकनं ] (आडनांवें-नाणवटी शब्द पहा)
-२ [ ज्ञानम् = नाणँ = नाणें ] knowledge. खरें नाणें झांकत नाहीं.
-३ [ नामांकनकं = णाआँअणअँ = णाँणँ = नाणँ = नाणें ] नाण हा शब्द शुद्ध प्राकृतिक आहे. त्याचें पुन्हा संस्कृत नाणाकं. हा शब्द मृच्छकटिकांत येतो. (भा. इ. १८३२) ना. को. १४