Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश

तरतरित [ तृ to be young = तरतरित denominative form a lost root meaning to be young-to be seen in तरुण young. my own guess; no other authority.

तरम [ तर्मन् (वर्ष ) = तरम ] तरम म्हणजे वर्षाचें देणें शेतकर्‍याचें.

तर मग [ तर्हि मक्= तरी मग, तर मग ] (भा. इ. १८३३)

तरवणी [ तरत् पानीयं = तरावणीअँ = तरावणी = तरवणी ] ताकाचें तरवणीं. ( भा. इ. १८३४)

तरवळा [ तृपला (लता) = तरवळा (उष्णादि १०९) ] तरवळा म्हणजे दाढी भाजण्याकरितां जमविलेला पालापाचोळा, वेली वगैरे. (भा. इ. १८३३)

तरांडें १ [ ( पुं) तरांधुः = तरांडें (न. ) ] a boat. 

-२ [तरन्ती = तरांडी, तरांडें ] (भा. इ. १८३३)

तरि [ तर्‍हि + ] ( शा. अ. ९ पृ. १ )

तर्कारी [ तर्कारी ( टांकळा) = तर्कारी ( भाजी ) ]

तर्र [ तरल = तर्र tremulous with intoxication ] ( धातुकोश-तरार २ पहा)

तर्‍हा [ त्र्यहः = तर्‍हा ] त्याची तर्‍हा झाली म्हणजे तो तीन दिवस कंठत बसला. (भा. इ. १८३५)

तर्‍हीं [ तर्‍हि अपि ] ( ज्ञा. अ. ९ पृ. ९ )

तर्‍हेवायिक [ त्र्यहैहिकः । ईहा चेष्टा तस्यां भवं ऐहिकं । त्र्यहपर्याप्तं ऐहिकं धनं अस्य अस्ति इति त्र्यहैहिकः ॥ ( मनुचतुर्थीध्याय ७, कुल्लूक ) त्र्यहैहिक = तर्‍हैहिक = तर्‍हेवाइक ] तर्‍हेवाईक म्हणजे तीन दिवसांपुरतें धान्य ठेवणारा, निरिच्छ, बेफिकीर. (भा. इ. १८३४)

तर्‍हैं [ तर्‍हि + अपि ] ( ज्ञा. अ ९ पृ. १ )

तलवट [ तलपथ = तलवट ] level, lowest level.

तवकीर [ त्ववक्षीरी क्षीरिका शुभा ॥ केयदेव-पथ्यापथ्यविबोध). त्ववक्षीरी = तवखार = तवकीर] (भा. इ. १८३४)