Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश

ठाणें [ स्थानीयं = ठाणें ] स्थानीय म्हणजे नगर, शहर.

ठाम १ [ स्तामं = ठाम. स्तम् अवैक्लव्ये ]
ठाम सांगतों म्हणजे अवैक्लव्यानें सांगतों.

-२ [ स्थाम्ना = ठाम ]

ए १ ठाय [ स्था १ स्थायति, स्थाति (ठाए) । ]
स्था हा धातू पूर्ववैदिककालीं स्थाति, स्थायति असा साधा चाले. ती चाल मराठींत राहिली आहे ।
पाय (ए) हृदय गवसूनि ठाय ( ए )
या चा उच्चार ए ।
श्रीगुरूचे पाए । हृदय गवसूनि ठाए ।
तैं एवडें भाग्य होए । उन्मेषासि ॥ ५ ॥ ज्ञा. १३-५

ठार १ [ स्तृह् = ठरह् = ठार. स्तृह् इजा करणें ] (भा. इ. १८३४)

-२ [ स्तृह् ६ हिंसायाम् ] ( धातुकोश ठार पहा )

ठाव १ [स्त्यै १ शब्दे. स्ट्याय स्त्याय = ठाव, ठोठाव. ष्ट्यायः स्त्यायः = ठावा, ठो ] ठोठो करणें = शब्द करणें. (धा. सा. श.)

-२ [ स्थामन् = ठाव ] मला ठाव द्यावा पायीं ।

ठावा [ ष्ट्यायः स्त्यायः = ठावा ] ( ठाव पहा)

ठावें [ स्ताव्यं = ठावें ] known. मला ठावें नाहीं.

ठासून [ स्थास्नु - ठासून ] त्यानें ठासून भापण केलें. तेन स्थास्नु भाषणं कृतम्. येथें ठासून हें विशेषण आहे. (भा. इ. १८३३)

ठाळ [ स्थाल = ठाळ ] जेवायचें पात्र. ( भा. इ. १८३४)

ठिकडें [ स्त्री = ठी ] प्रेमदर्शक कडें प्रत्यय लागून ठिकडें. स्त्रीला प्रेमानें ठिकडें म्हणतात. माझी टिकुडी, माझें ठिकड़ें, असा प्रयोग स्वस्त्री संबंधानें नवरा करतो.

ठिकाण १ [ त्रिकस्थान = ठिकाण, ठिकाणा ]

-२ स्थितिकर्णः = टिकाण, टिकाणा ] 

ठिक्कर [ तिग्मतर = ठिक्कर ] काळा ठिक्कर.

ठिपका [ स्तिप् गळणें ] (थिबकणें पहा )