Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश

जनू [ जन्य (कर्तरि, कर्मणि ३-४-६८ = जनू ] what is born. जनू म्हणजे बालक.

जंत्री [ यंत्री = जंत्री ]
कोणत्या हि व्यवहारांत वाट दाखविणारी ती जंत्री.

जप, जप्ति [ ज्ञप् ज्ञाने, ज्ञापने ] मी त्याची मर्जी फार जपतों म्हणजे खुष करतों. ज्ञप्ति = जप्ति. ( धा. सा. श.)

जप्ति [ ज्ञप्ति ( वध करणें ) = जप्ती ] पहिला अर्थ वध करणें, दुसरा अर्थ धनादिकांचा बंध करणें.

जंबाड १ [ बध् १० संयमने. संबाधः = जंबाड ] जंबाड म्हणजे गुंतलेले केस, वेली इ. ( धा. सा. श. )

-२ [जंबाल = जंबाड ] जंबाड म्ह० शेवाळाची जूड, चोथा. ( भा. इ. १८३५)

जम [ यम: = जम ]

जमदाड [ यमदंष्ट्रा = जमदाड ] शस्त्रविशेष.

जमनीक [ जवनिका = जमनीक ]

जमविणें [ समवे = जमवि ( णें ) ] (भा. इ. १८३५)

जमाव १ [ समवाय = जमआय = जमाय = जमाव ] (भा. इ. १८३५)

-२ [ सम् + अव + इ २ गतौ ] (धातुकोश-जम २ पहा]

जयजय [ जेजेति, जेजय = जयजय ( Freq-lmp-२nd-sing.) ]

जरा [ अचिरात् = जिरा = जरा ] जरा म्ह० थोडें, अल्प, अव्यय. अचिरात् गत्वा प्रत्यागछामि = जरा जाऊन येतों. (भा. इ. १८३६)

जरि [ जर्‍हि ] (ज्ञा. अ. ९ पृ. ४ )

जरीपटका [जर्जरीक पटकः = जरीपटका ] जईरं म्हणजे इंद्रध्वज

जर्जर [ झर्झर - जर्जर ]रे रे गुर्जर झर्झरोसि समरे-( प्रतापरुद्रीयम्) ( भा. इ. १८३४)

जर्‍हैं [ जर्‍हि अपि ] ( ज्ञा. अ. ९ पृ. ४ )

जयकिरा १ [ यव + क्रयः. यवक्रयः = जवकिरा ] धान्य वगैरे विकत घेणें.

-२ [ क्री ९ द्रव्यविनिमये. चवक्रय = जवकिरा. अवक्रेणी = उग्रेणी = उग्राणी. विक्रेणी = विग्रेणी = बिग्राणी ] ( धा. सा. श. )

जवळ - ज्ञानेश्वरींत जावळिक म्हणजे जोडींतला, सोदर, अशा अर्थाचा शब्द आहे. हा जावळिक शब्द = युगल, युगलक, या संस्कृत शब्दापासून आला आहे. जुळें, जावळें हे शब्द मराठींत प्रसिद्ध आहेत. हा मूल त्या मुलाच्या जावळिकेंतील आहे, असा प्रयोग पूर्वी होत असे. जावळिकेंतील म्हणजे एकाच उदरांतील. समानोदरत्वावरून जावळिक म्हणजे निकटसंबंधी असा अर्थ होऊन व शेवटीं मराठींत छाटछाट होऊन जवळ याचें शब्दयोगी अव्यय निष्पन्न झालें. (स. मं.)