Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
स्थलनामव्युत्पत्तिकोश
जुथल - यूथरः (पा. ना.)
जेतपुर - जयंत ( इंद्रसूनुः ) - जयंतकपुरं. खा म
जेवरें - जयपुरं (जेऊर = जेवरें ) मा
जैतपीर - जयंत ( इंद्रसूनुः ) - जयंतप्रियां. खा म
जैतपुर - जयंत ( इंद्रसूनुः ) - जयंतपुरं. खा म
जैताणें - जयंत ( इंद्रसूनुः ) - जयंतवनं. २ खा म
जोंग - वंशकागुरुराजार्ह लोहकृमिजजोंगकम् । ( अमर - द्वितीय - नृवर्ग १२६)
हिमालयाच्या उत्तरेस खोर्यांना जोंग म्हणतात. कोणताही भूगोल पहा.
तात्पर्य, अमराच्या कालीं हि या प्रदेशांना जोंग हेंच नांव होतें.
अगुरु जोंग प्रदेशांत होतो म्हणून त्याला जोंगक म्हणत. ( भा. इ. १८३४)
जोगरहळ्ळी - युगंधर. (पा. ना. )
जोगलखेडी - योगिन् (जोगी लोक ) - योगिकुल खेटिका. खा म
जोगलखेडें - योगिन् ( जोगी लोक). योगिकुलखेटं. ३ खा म
जोगशैलू- योगिन् (जोगी लेक) - योगिशैलं. खा म
जोगेसरी घाट - योगेश्वरी घाटः खा प
जोधपुर - यौधेयपुर. (उपनाम व्युत्पत्तिकोश - जेधे पहा)
जोनपूर - यवन. (पा. ना.)
जोर - यौकरीयं. (पा. ना. )
जोरण - जुहुराण (चंद्र ) - जुहुराणं. खा म
ज्वार्डी - यवनारवाटिका. ३ खा व
झ
झरपाडा - झर (झरा) झरपाटकः खा नि
झरें - झर ( झरा ) - झरकं. खा नि
झळंबी - झर (झरा) - झरांबिका. २ खा नि
झाडी - झाटी - झाटिका. २ खा व
झामणझरी - यमुना (यामुन = लोकनाम). यामुनझरी. खा म
झालगांव, झालरापट्टण, झालवाडी - (कर्णाटक पहा).
झिरवें - झिरिकावहं. खा इ
झिरी - झिरिका (रातकिडा) - झिरिका. २ खा इ
झुमकटी - झूणिकंधा. खा व
म. धा. ३८