Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

स्थलनामव्युत्पत्तिकोश

ढोंग - } धूपांग } (सरल वृक्ष) खा व
ढोपर - } धूपाई }

ढोमण - धूम्रक ( शिसू) - धूम्रकवनं. खा व

ढोलवारें - धवलिकाद्वारं. खा नि

ढोलासिंगी - धवलिकाशृंगिका. खा नि

ढोली - धवलिका. खा नि

 

तटबुधें - तट ( उतरण) - तटंबौद्धं. खा नि

तताणी - ततपर्णी. २ खा व

तपोवन - तपोवनं. खा नि

तरंगवाडी- त्रंग (हरिश्चंद्राचें आकाशनगर) - त्रंगवाटिका. खा म

तरगार - सं. प्रा. तरकागाहर. यल्लापूर. ( शि. ता. )

तरडी - तरट (तरवड) - तरटिका. खा व

तरडें - तरट ( तरवड ) - तरटकं. २ खा व

तरसाळी - तरक्ष (तरस) - तरक्षपल्ली. खा इ

तरसोद - तरक्ष (तरस ) = तिरक्षोदं. खा इ

तरोडें - तर - तरवाटं. खा नि

तर्‍हाड - तर. खा नि

तर्‍हाडी - तर - तरवाटिका. २ खा नि

तर्‍हावद- तर - तरावर्त. खा नि

तलखेड - तल. खा नि

तळई - तल - तलावती. खा नि

तळदी - तरदी ( वनस्पति). खा व

तळबीड - तलविधं = तळबीड.
भैरिक्याद्यैषुकार्यादिभ्यो विधल्भक्तलौ (४-२-५४ ). विध हा प्रत्यय देशवाचक आहे. भौरिक्यादि गणांत किंवा ऐषुकार्यादि गणांत तल शब्द नाहीं. तेव्हां तो ह्या गणांत नवीन घातला पाहिजे.

तळवाडें - तलवाट = तळवाड = तळवडें = तळवडें (ग्रंथमाला)

तळेगांव - तलग्रामं (मावळांतील मुख्य गांव - तलावाशीं कांहींएक संबंध नाहीं.)

तळेगांव - तल - तलीयग्रामं. २ खा नि

तळवाडें - तलपाटं. १० खा नि