Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

स्थलनामव्युत्पत्तिकोश

जांब - जांबवं ( पाणिनि २-४-७ ) = जांब.
रामदास स्वामी ज्या गांवीं जन्मले त्या गांवास जांब म्हणतात व त्याचें मूळ संस्कृत रूप जांबवं होतें. (भा इ. १८३७ )

जांब - जांबव = जांब. जांबवंनगरं (पाणिनीय सूत्र २-४-७ खालीं हे शब्द दिले आहेत). (भा. इ. १८३६) जांबवडें - जंबुवाटं (झाडावरून). मा

जांबवली - जंबुपल्ली (जंबुवृक्षावरून). मा

जांबवा - सं. प्रा. जंबुवाविका ( जैबुवापिका ). बडोदें (शि. ता.)

जांबवाहाळ - जंबुवाहालि. खा व

जाबळी - जाबालि (ऋषिनाम). जाबालिका. खा म

जांबुळपाडा - जांबुलपाटी = जांबुलपाट = जांबुलपाटक = जांबुळपाडअ = जांबुळपाडा. नागपाडा, नवापाडा. पाटक, पाटी = अर्धागांव, गांवाचा भाग, थळ वगैरे. (ग्रंथमाला)

जांबोली - जंबु, जंबुल ( जाम) जंबुलिका. खा व

जांभळी - जंबुपल्ली. खा व

जांभापाडा - जंभ (राक्षस नाम) - जंभकपाटकः. खा म

जांभूळ - जंबु ( स्वार्थ ल ). मा

जांभोरें - जंभ ( राक्षसनाम ) - जंभपुरं २ खा म

जांभोळ - जंबुपल्लं. खा व

जाम - जंबु. खा व

जामकी - जंबुक ( कोल्हा) - जंबुकी. खा इ

जामकी माकडी - जंबुक (कोल्हा) - जंबुकी मर्कटिका. खा इ

जामखेल - जंबुखेटं खा व

जामटी - जंबु - जब्वाट्टिका. खा व

जामडी - जंबु, जंबुल (जाम) - जबुंवाटिका. ३ खा व

जामणें - जंबुवनं. ४ खा व

जामतळें - जंबुतलं. खा व

जामध - जंबुधं. खा व

जामधें - जंबु, जंबुल ( जाम ) - जंबुधं. ३ खा व

जामनेर - जंबुनीवरं. खा व

जामदरी - जंबुदरी. खा व

जामलें - जंबुपल्लं. ३ खा व

जामशेत - जंबुक्षेत्रं. खा व