Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

स्थलनामव्युत्पत्तिकोश

खटवाणी - खटिक (खडू) - खटवाहनी. खा नि

खटाळ - खट्टालि: (तृणविशेष). खा व

खडक - कटक (सैन्याचा तळ ) - कटकं. खा नि

खडकतळे - कटक (सैन्याचा तळ)-कटकतलं. खा नि

खडकदेवळें - कटक (सैन्याचा तळ) - कटकदेवलकं. खा नि

खडकवण - कटक (सैन्याचा तळ)- कटकवनं. खा नि

खडकाळें - खडक+तल=खडकअळ=खडकाळ =ळँ=ळें.
कार + तल = कारअळ = कार्ळ =ळँ = ळें.
लवण + तल = लोन + अळ = लोनाळ = ळँ =ळें = लेनावळें.
खंड + तल = खंड + अळ = खंडाळ = ळँ = ळें.
खिंड + तल = खिंड + अळ = खिंडाळ = ळँ = ळें. ( ग्रंथमाला )

खडकाळें - कटकालयं ( मावळ प्रांतांतील तत्कालीन राजाच्या सैन्याचें ठाणें ). मा

खडकी - कटकी. खा न

खडकी - कटक (सैन्याचा तळ) - कटकिका. १० खा नि

खडकें - कटक (सैन्याचा तळ ). कटककं. ४ खा नि

खडक्या - खडक्किका ( खिडकी ) - खडक्किका. खा नि

खडगांव - खटिक (खडू) - खटिकग्रामं. खा नि

खंडणे - खंड ( चीर, तुकडा, भेग) - खंडवनं. खा नि

खंडवाय - खांडव (अरण्यनाम) खांडवावती. खा नि

खंडाळे - कंदरिकं - कंडळिय = खंडाळें a village in a vally कंदर.

खंडाळे - खिंडपल्लं (बोरघाटाच्या खिंडीतलें गांव). मा

खंडाळे - महाराष्ट्रांत खंडाळीं पुष्कळ आहेत. खिंडतल, खंडतल, खंडअळ, खंडाळ, खिंडाळ अशा परंपरेनें हा शब्द आला आहे. खिंडीच्या तळचें किंवा माथ्यावरचें जें गांव तें खंडाळे.
(महाराष्ट्र इतिहास-मासिक श्रावण शके १८२६)

खंडाळे - (खडकाळें पहा).

खंडाळे-खंड ( चीर, तुकडा, भेग ) - खंडपल्लं. ५ खा नि

खंदार - गंधर्व. (व्यक्तिनाम व्युत्पत्ति कोश-गांधारी पहा)

खपाट- क्षपाट ( राक्षसनाम )-क्षपाटकं. खा म

खमगांव- खर्म ( रेशीम ) - खर्मग्रामं. खा नि

खमताणें - खर्म (रेशीम ) - खर्मस्थानं. खा नि

खमाणें - खर्म (रेशीम ) - खर्मवनं. खा नि