Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

स्थलनामव्युत्पत्तिकोश

असली - अप्सरस् - अप्सरःपल्ली. ३ खा म

असलोद - अप्सरस् - अप्सरःपद्रं. खा म

असवाडें - अश्मक, असिक (लोकनाम) अश्मकवाटं. खा म

असाणे - अश्मक, असिक ( लोकनाम ) - अश्मकवनं. खा म

असूस - अश्मककर्ष. खा म

असोदें - अश्मक (लोकनाम ) - अश्मकपद्रं. खा म

असोळी - अश्मक (लोकनाम) - अश्मकपल्ली. २ खा म

अस्ताण - असिक ( लोकनाम ) - असिकस्थानं. खा म

अहमदनगर - (अमदानगर पहा).

अहीरवडें - अभीरवाटं ( अभीरांचें गांव ). मा

अहीरवाडी - अभीर - अभीरवाटिका. खा म

अहूळ - अहि (सर्प) - अहिपल्‍लं. खा इ

अहेरें - अभीर - अभीरकं २ खा म

आइतवडे - सं. प्रा - आइतवाडा ( आदित्यवाटिकः ) ( शि. ता. )

आकलकोश - आकल्ल. खा व

आंकलास - सं. प्रा. - अक्रूरेश्र्वर. (शि. ता.)

आंकलें - सं. प्र. - अकूरेश्र्वर (शि. ता.)

आंकलेसर - सं. प्रा. - अक्रूरेश्वर. (शि. ता.)

आटपाटनगर – अट् गमने व पट्गमने. आटपाटनगर= आलें गेलें नगर, कोणतें तरी निनांवी रहदारीचें गांव म्हणजे आटपट नगर (ग्रंथमाला)

आढलें (खुर्द) - आढकपल्लं (आढक = तुर). मा

आढें - आढकं ( तुरीच्या उत्पन्नावरून). मा

आतवण - अंतर्वनं ( वनाचा गाभारा). मा

आंधेरी - अंधकागिरि = आँधअइरि = आंधेरी. कृष्ण द्दा अंधक कुलांतील होता. (भा. इ. १८३३)

आनकवाडी - आणक ( क्षुद्र). खा नि

आनकवाडे - आणक (क्षुद्र). खा नि

आनंदपुर - आनंद. खा नि

आपटी - आपटी (झाडावरून). मा

आंबळे - आम्रपल्लं (झाडावरून). मा