Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

स्थलनामव्युत्पत्तिकोश

उभोणें - अभ्रवनं. खा नि

अमकट – आम्रकंथं. खा व

अभोणें - अभ्रवनं. खानि

अमकट - आम्रकंथं. खा व

अमखेड - आम्रः (अंबा) - आम्रखेटं. खा व

अमखेडें - आम्रः (अंबा ) आम्रखेटं, खा व

अमणपुर - अमंड (एरंड). खा व

अमथें - आम्रः (अंबा) आम्रप्रस्थं. खा व

अमदगव्हाण - अमंदगवादनी. खा व

अमदगांव - अमंदग्राम. खा व

अमदड, अमदर - आम्रः (अंबा) आम्रदर: खा व

अमदानगर - देवगिरि ऊर्फ देवीचा घांट चढून वर आलें म्हणजे अमदानगर लागतें. ह्यालाच प्रस्तुतकालीं अहमदनगर म्हणतात. अहमदनगर हा अमदानगर शब्दाचा अपभ्रंश आहे. अमदा म्हणून यादवकुळांतील एका राजाची नाटकशाळा होती. तिच्यावरून ह्या शहराला अमदानगर असें नांव पडलें असें कित्येक लोक म्हणतात. अमदा ऊर्फ अमळा ह्या नदीच्या नांवावरून हें नांव पडलें असेंहि कित्येकांचें म्हणणें आहे. ह्यांपैकीं कोणतें म्हणणें खरें धरलें तरी ह्या शहराचें नांव मूळचें फारशी नाहीं हें निर्विवाद आहे.
(महाराष्ट्र इतिहास मासिक, श्रावण शके १८२६)

अंमदाबाद - खा मु

अमरकुवा - अमर (देव) अमरकुंबः खा म

अमरावती - अमरावती. खा न

अमराळें - अमर (देव) अमरालयं. खा म

अमलगुडी - अमला (आंवळी) अमलाकूटि. खा व 

अमलवाडी - अमला (आंवळी) अमलावाटिका. खा व

अमला - अमला(आंवळी) खा व

अमलाड - अमला(आंवळी) अमलावाटं. खा व

अमलाण – अमला (आंवळी) अमलावनं. खा व

अमली - अमला (आंवळी) खा व

अमलीपाडा - अमला(आंवळी) अमलापाटकः. खा व

अमलीपाणी - अमला (आंवळी) अमलापानीयकं. खा व

अमळगांव - अमला(आंवळी) अमलानांवरं. खा व

अमळनेर-अमला (आंवळी) अमलानीवरं. खा व

अमळथें - अमला ( आंवळी) अमलाप्रस्थं. खा व

अमोणी - आम्रः (अंबा) आम्रवनी. खा व

अमोणीबारी - अमोणीगांवाची बारी. खा प

अमोदें - आम्रः ( अंबा ) आम्रपद्रं. खा व

अम्रावें - आम्रः ( अंबा) आम्रवहं. खा व