Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

स्थलनामव्युत्पत्तिकोश

वल्हेगांव - वल (इंद्र) - वलकग्रामं. खा म

वसई - सं. वसति = प्रा. वसइ.
(महाराष्ट्र इतिहास मा. श्रा. श. १८२६)

वसतशेवोळ - } वासातिक. कल्याण. (पा. ना.)
वसतशेळवली - }

वसनार - वसर्हन् (अग्नि वैदिक शब्द)- वसईन् - खा म

वसमाणें - वसामाणिकं. खा नि

वसर - उज्झर (वाहाता नाला). ,,

वसलाई - वत्सला (देवी) - वत्सलावती. खा म

वहकळखेडें - बाष्कळ (ऋषिनाम) - बाष्कलखेटं. खा म

वहाणगांव - उपानद्ग्राम ( राजाच्या जोड्या संबंधानें विशेष गोष्ट घडली असावी त्यावरून). मा

वहीवाडा - वृत्ति + वाटः = वहीवाडा encloswes or railings or fences.

वह्याणें - वह्य (गाडी ) - वह्यवनं. खा नि

वळ - वल (इंद्र) - वलकं. खा म

वळई - सं. प्रा. वलभी. सातारा. (शि. ता.)

वळकाद - बालादक. (पा. ना.)

वळख - प्लक्ष (= पालख = वळख) (प्लक्ष वृक्षावरून प्लक्ष म्हणजे अंजिराचीं झाडें. प्लक्षवरून प्लक्षद्वीपाला
ऊर्फ Pelasgians च्या देशाला पुराणांत नांव आहे). मा

वळवडे - सं. प्रा. वळवाड. (शि. ता.)

वळवंडे - वालुवंटं.

वळवंती - वलावंती (वल झाडावरून ). मा

वळवाड - वल (इंद्र ). खा म

वळवाडी - वल (इंद्र) - वलवाटिका. ३ खा म

वळें - सं. प्रा. वलभी. कैरा, रेवाकांठा, काठेवाड. (शि. ता.)

वाई - वायक (साळी) - वायिका. खा म

वाईनगंगा - अर्वाचीनगंगा = (अलोप) वाईणगंगा = वाईनगंगा.

वाउंड - वातिपद्रं (फार वारा असणारें गांव ). मा

वांक - वक्र, वंक. वंक्रं. खा नि

वांकडी - वक्र, वंक - वंकवाटिका. ४ ,,

वांकट - वक्र, वंक - वंकपद्रं. ,,

वांकपारलें - वक्र, वंक - वंकंपारपल्लं. ,,

वाकसई - वंक्षावती. मा