Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

स्थलनामव्युत्पत्तिकोश

वरशी - वरक (वरी) - वरकर्षा. खा व

वरसांड - वरकसंधि. ,,

वरसूम - वरक ( वरी ) - वरकंसुह्यं. ,,

वरसूस - वर्षाकर्ष. खा नि

वरसोली - वर्षांपल्ली (पुष्कळ पाऊस पडणारें गांव).

वरळ - वरक (वरी ) - वरपल्लं. खा व

वराटी - वाराटकीयं. महाड. (पा. ना.)

वराड - वैदर्भ. पुणें, ठाणें, रत्नागिरी. (पा. ना.)

वराड - वरक ( वरी ) - वराट्टकं. ५ खा व

वराडें - वैदर्भ. सातारा. (पा. ना.)

वराह - वराहक:. धारवाड. ,,

वराळें - वरालयं (उत्तम स्थान ). मा

वरुटी - वारत्रक. भोर. (पा. ना.)

वरुळी - उरःपल्ली = उरुळी, वरुळी. (भा. इ. १८३६)

वरूळ - वरक (वरी ) - वरपल्लं. ४ खा व

वर्णोल - वर्णु. ठाणें. (पा. ना.)

वर्‍हाड - मराठा शब्द महाराष्ट्र शब्दाचा अपभ्रंश कित्येक समजतात. कित्येक महारट्ट शब्दाचा अपभ्रंश असावा असें म्हणतात आणि कित्येक महरट्ट असें या शब्दाचें मूळ स्वरूप असावें असें प्रतिपादितात. पैकीं दुसरी व्युत्पत्ति विद्वानांना मान्य आहे असें दिसतें. डॉ. भांडारकरांनीं आपल्या दक्खनच्या इतिहासांत हीच व्युत्पत्ति मनिली आहे. शकांच्या, शातवाहनांच्या व अशोकाच्या वेळीं दक्षिणेत रट्ट म्हणून एक लोक होते; त्यांचेच भाऊबंद रड्ड, रड्डी वगैरे उत्तर कर्नाटकांतील कांहीं जुने लोक होत; ह्या रट्टांपैकीं कित्येक कुळी महा पराक्रमी निघाल्या व त्यांनीं आपल्याला महारट्ट असें बहुमानार्थी नांव घेतलें; वगैरे अनुमानें काढलेलीं प्रसिद्ध आहेत. कार्ले येथील शिलालेखांत महारथी व महारथिनी असे शब्द आलेले आहेत. ते दोन ( हजार )+ वर्षांपूर्वीच्या मराठ्यांचे वाचक आहेत असें बहुतेक सर्व प्राचीन लेखशोधकांचें म्हणणें आहे; परंतु महारथी ह्या संस्कृत शब्दाचें महारट्ट असें प्राकृत रूप कसें झालें हें नीट उलगडून कोणींच दाखविलें नाहीं. रथ शब्दाचें रह व रथी शब्दाचें रही अशीं प्राकृत रूपें होतात; रट्ट व रट्टी अशीं होत नाहींत. महारथी उगाच मजेखातर रूप लिहिलें, असेंहि म्हणणें शोभत नाहीं. कारण हे शिलालेख कांहीं कोणाला फसविण्याकरितां लिहिलेले नाहींत.