* हा तिडन्त विचार धातू प्रकार दृष्ट्या मांडला आहे.
अय् लागून भावय् अंग होते असे जितके म्हणता येईल तितकेच भावय् यातला अय् जाऊन व भाव् यातील आव् चे वृद्धिमूल ऊ होऊन भू हा तद्भव धातू होतो असेही म्हणता येईल. शंकेला उत्तर असे आहे की प्राथमिक आर्य कोणते अंग योजीत होता, भावय् अंग योजीत होता की भू अंग योजीत होता, ते पाहून मूळ धातू भावय् का भू हे ठरवावयाचे असते, म्हणजे मूळ धातू ठरविण्याला इतिहास हे प्रमाण आहे. शोधाअंती असे आढळून येते की प्राथमिक आर्य अत्यंत पुरातनकाळी भूति असे लट् च्या प्रथमपुरुषाच्या एकवचनाचे रूप योजो. त्यावरून भू हा मूळ धातू समजणे न्याय्य होते व भावय् इत्यादी अंगे तद्भव समजणे युक्ति सिद्ध ठरते. एतत्संबंधक तपशील पुढील कलमांत केला आहे.
पूर्ववैदिक भाषांत एक भाषा अशी होती की तीत धातूंत आदी, अंती किंवा मधी काही एक विकार न होता, त्यांना प्रत्यय लागत ह्न त्या अविकरण भाषेत धातुपाठाकत जेवढा म्हणून धातुसमूह पाणिनीने दिला आहे तो सर्व, काही एक विकार न पावता, प्रत्यय घेई उदाहरणार्थ ह्न