पैकी त् व स् हीं सर्वनामे एकार्थक असून एकमेकांच्या बदली योजिली जात. कारण प्राथमिक भाषेंत त् व स् यांचे उच्चार बहुतेक सारखे असत. या आठ दुहेरी सर्वनामांना पुढे मागे अ वगैरे सर्वनामे जोडून काही तिहेरी सर्वनामे बनत :
अस् + अ = अस
अम् + अ = अम
इम् + अ =इम
अन् + अ= अन
त् + अत् = तत्
अम् + उ=अमु
अत् + अस् = अदस्
ए + त = एत
इत् + अम् = इदम्
ए + अम् = अयम्
ए + न् + अ = एन
ए + अ= अय
ए + तत् = एतत्
इदम् सर्वनाम सन्निकृष्ट अर्थ दाखविते. त्याहून अलीकडला ऊर्फ सन्निकृष्ट तर ऊर्फ समीपतर अर्थ एदत् सर्वनाम दाखविते. तत् सर्वनाम परोक्ष म्हणजे डोळ्यापलीकडील गैरहजर पदार्थ दाखविते आणि अदस् सर्वनाम परोक्ष ऊर्फ डोळ्यापलीकडील पदार्थाहून अलीकडला म्हणजे डोळ्याच्या टप्प्याच्या आतील परंतु दूरचा हजर पदार्थ दाखविते. एतद् अत्यंत समीप पदार्थ दाखविते. इदम् त्याहून कमी समीप म्हणजे (किंचित् दूरचा पदार्थ दाखविते. अदस् अत्यंत दूरचा पदार्थ दाखविते आणि तत् गैरहजर पदार्थ दाखविते. सन्निकर्ष विप्रकर्ष दाखविणारे हे अर्थ या चार सर्वनाम शब्दांना आले कसे ते पहाण्यासारखे आहे. मूळ प्राथमिक पूर्ववैदिक भाषेत अ, इ, उ, ऋ, त्, स्, न्, म् अशी आठ दर्शक सर्वनामे असत. पैकी अ अत्यंत सन्निकृष्ट पदार्थ दाखवी. इ त्याहून कमी सन्निकृष्ट पदार्थ दाखवी. म् व न् इ हून कमी सन्निकृष्ट पदार्थ दाखवीत. उ किंचित् विप्रकृष्ट पदार्थ दाखवी. ऋ त्याहून विप्रकृष्ट पदार्थ दाखवी आणि त् व स् अत्यंत विप्रकृष्ट म्हणजे परोक्ष पदार्थ दाखवीत. या एकाक्षरी सर्वनामांचे अनेक जोड होत. पैकी काही येणेप्रमाणें: ह्न
अ + अ = या (अत्यंतात्यन्त सामीप्यदर्शक)
अ + इ = ए (अत्यंतात्यन्त सामीप्यदर्शक )
अ + त् = अत् (परोक्षाहून कमी विप्रकर्षदर्शक )
अ + स् = अस् (परोक्षाहून कमी विप्रकर्षदर्शक )
अ + म् = अम् (परोक्षाहून अत्यंत कमी विप्रकर्षदर्शक म्हणजे बरेच सन्निकृष्ट )
अ + न् = अन् (परोक्षाहून अत्यंत कमी विप्रकर्षदर्शक )
इ + त् = इत् (परोक्षाहून कमी विप्रकर्षदर्शक )
इ + न् = इन् (परोक्षाहून अत्यंत कमी विप्रकर्षदर्शक )
इ + म् = इम् (परोक्षाहून अत्यंत कमी विप्रकर्षदर्शक )
इ + इ = ई (सामीप्यदर्शक)
उ + स् = उस् (अत्यंत विप्रकर्षदर्शक )
उ + ऋ = उर् (अत्यंत विप्रकर्षदर्शक )
त् + अ = त (आत्मनायकत्वदर्शक)
त् + इ = ति (वर्तमानकालदर्शक)
त् + उ = तु (विप्रकर्षदर्शक)