Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

इ. इ. इ. येणेप्रमाणे हे सर्व शब्द वचन, लिंग किंवा विभक्ती यांच्या प्रत्ययांखेरीज जसेच्या तसे योजता येतात. वैदिकभाषेत हे अव्यय शब्द का आले याचे कारण या शब्दासंबंधाने आर्यांच्या मनात असलेला धर्म ह्न विषयक पूज्यभाव. हे सर्व शब्द आर्यांच्या धर्मखात्यातील म्हणजे यज्ञप्रकरणातील आहेत. तेव्हा ते जसेच्या तसे योजण्यात मंत्रसामर्थ्य विशेष असणार या भावनेने हे शब्द पिढ्या न पिढ्या जसेच्यातसे वैदिककाळापर्यंत उतरले, त्यांच्यात अणुमात्र फेरफार झाला नाही व खपला नसता. या धार्मिक भावनेमुळे, शाब्दिक व वैय्याकरण जे आहेत त्यांचा , मात्र, सद्य:काळी फार फायदा झाला आहे. त्यांना वैदिक आर्यांचे पूर्वज अत्यंत प्राथमिक अवस्थेत वचथप्रत्ययांशिवाय, लिंगप्रत्ययांशिवाय व विभक्तिप्रत्ययांशिवाय, लिंगप्रत्ययींशिवाय व विभक्तिप्रत्ययांशिवाय कसे बोलत असतील त्याचा थोडासा मासला या धार्मिक भावनेच्या द्वारा अद्यापही प्रत्यक्ष पहावयास मिळतो, केवळ अनुमानधपक्यावर विसंबण्याची आपत्ती ओढवत नाही !