तिन्ही पुरुषी द्विवचनी व बहुवचनी व्यावर्तक म्हणजे आत्मने व सवावर्तक म्हणजे परस्मै रूपे येणेप्रमाणे होतात व त्यांचे अर्थ येणेप्रमाणे असतात :
१ २
आत्मने व व्यावर्तक परस्मै व समावर्तक
१ पचावहे (आह्मीं दोघे स्वत: शिजवितों) पचावह् (मी व तो अन्य असे दोघे शिजवितो)
२ पचामहे (आह्मी विद्यमान तिघे स्वत: शिजवितो पचामह् (मी व इतर अन्य लोक शिजवितों)
१ पचेथे (तुह्मी दोघे स्वत: शिजविता) पचथह् ( तू व तो दुसरा शिजविता)
२ पचथ्वे (तुह्मी तिघे स्वत: शिजविता) पचथ (तू व ते इतर शिजविता)
१ पचेते (ते दोघे स्वत: शिजवितात) पचतह् (तो (दृश्य) व ते इतर अदृश्य शिजवितात)
२ पचन्ते (ते तिघे स्वत: शिजवितात) पचंति (तो (दृश्य) व इतर शिजवितात )
प्रथम मध्यम उत्तम
वरील उदघाटनावरून दिसेल की क्रियाफल जेव्हा कर्त्रभिप्रायक असेल तेव्हा आत्मनेपदी रूपे योजिली जात आणि क्रियाफल कत्रितराभिप्रायकही जेव्हा असेल तेव्हा परस्मैपदी रूपे योजिली जात. आत्मनेपदी रूपात क्रियेचे भोक्तृत्व फक्त कृर्त्याला मात्र असते. परस्मैपदी रूपात क्रियेचें भोक्तृत्व इतरांच्या हिवाट्यास येते. द्विवचनी व बहुवचनी रूपांप्रमाणेच तिन्ही पुरुषांच्या एकवचनी रूपांची व्यवस्था असे.