Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

३८ तुभ्यम् व हभ्यम्, तुभ्य व हभ्य, मम व मे, मयि व हस्मिन् इत्यादी रूपांवरून दिसते की हम् व तुहम् हे शब्द व या शब्दांची विभक्तीरूपे, लिंगभेद भाषेत ज्याकाळी उद्भवला नव्हता, प्रत्ययांची वर्गाकवर्गी तृतीयादि विभक्त्यांत ज्याकाळी कायमची निश्चित झालेली नव्हती; भ्यम् सारखा एकच प्रत्यय एकवचनी व अनेकवचनी ज्याकाळी लागे; अशा प्राचीनकाळी प्रचलित झाली. हा प्राचीन काल म्हणजे वैदिकभाषा पूर्ववैदिकभाषांच्या मिश्रणाने नुकती बनत ज्या कालीं चालली होती तो काल. तुभ्यम् हे रूप प्राथमिक वैदिकभाषेत प्रचलित झाल्यानंतर, भ्यम् हा प्रत्यय भाषेतून अजिबात नष्ट झाला व त्याची जागा भ्यस् या प्रत्ययाने व्यापिली. तात्पर्य, भ्यस् प्रत्यय प्रचलित होण्यापूर्वी हम या सर्वनामाची रूपे बनून गेलेली होती. हीच मीमांसा पंचमीच्या भ्यत् प्रत्ययासंबंधाने करावी. उत्तमपुरुषसर्वनामांचा व मध्यमपुरुषसर्वनामांचा असा हा प्रपंच आहे. भ्यत् प्रत्यय भ्यस्च आहे, कारण त चा स पूर्ववैदिककाळी होत असे. म्हणजे भ्यत् असाही उच्चार होई व भ्यस् असाही उच्चार होई.