येथे सर्व प्रत्यय नदी शब्दाच्या प्रत्ययाप्रमाणे आहेत. पूर्ववैदिक भिन्न समाज, भिन्न भाषा बोलणारे होते व त्यांचा मिलाफ होऊन वैदिकसमाज व भाषा निष्पन्न झाली, असे हाही शब्द सांगतो.
१६ इकारान्त पति व सखि शब्द अत्यंत महत्त्वाचे आहेत. पति शब्दाची खालील रूपे हरि शब्दाच्याप्रमाणे चालतात.
१ २ ३
१ पति: पती पतय:
२ पतिम् पती पतीन्
३ पतिभ्याम् पतिभि:
४ ' ' पतिभ्य:
५ ' ' ' '
६ पतीनाम्
७ पतीषु
पति शब्दाची खालील रूपे कर्तृ शब्दाच्याप्रमाणे चालतात :
३ x १ पत्या
४ x १ पत्ये
५ x १ पत्यु:
६ x १ पत्यु:
६ x २ पत्यो:
७ x २ पत्यो:
इतकेच की, कर्त्रा, कर्त्रे, कर्त्रो: या रूपातल्या प्रमाणे पत्या इत्यादी शब्दांत रकार नाही. तो रकार जर घातला तर मूळशद्ब पत्यृ असा होतो व त्याचे षष्ठी एकवचनाचे रूप कर्तृ: प्रमाणे पत्यु: असे होते.
पति शब्दाचे पत्यौ रूप गुरु शब्दाच्या किंवा हरि शब्दाच्या सप्तमी एकवचनी रूपाप्रमाणे दिसते. म्हणजे मूळशब्द पत्यि किंवा पत्यु होतो.
याचा अर्थ असा की, पति शब्दाचीं रूपे १) पति २) पत्यृ व ३) पत्यि किंवा पत्यु या तीन शब्दांच्या रूपाच्या भेसळीने झाली आहेत. पैकी पति शब्द सर्वांच्या दाट ओळखीचा आहे. पत्यृ व पत्यि किंवा पत्यु हे शब्द मात्र कोणत्याच कोशात किंवा निघंटूंत सापडावयाचे नाहीत. पत्यृ काय? कशाचा अपभ्रंश असावा? शब्द मोठा मनोरंजक आहे, सबब, त्याचे मूळ शोधून काढण्याचा यत्न करितो. स्त्री असा शब्द आहे. हा शब्द ई प्रत्यय कोणत्या तरी ऋकारान्त शब्दाला लागून झालेला आहे. स्त्यायतेर्ड्रट् या उणादिसूत्रानें रत्यै संघाते या भ्वादि धातूपासून स्त्री शब्द निर्वचिण्याचा प्रघात आहे व तो रास्त आहे. संघातीकरण म्हणजे एका ठिकाणीं जुळवाजुळव किंवा मांडामांड करणे. अशी जुळवाजुळव किंवा मांडामांड करणारी जी तिला जुनाट पूर्ववैदिकभाषेत स्त्ऱ्यी म्हणत. या स्त्ऱ्यी शब्दाचा अपभ्रंश स्त्री. स्त्ऱ्यी ह्न जुळवाजुळव कशाची करी? तर घराची. पस्त्यं असा एक जुनाट शब्द आहे. त्याचा अर्थ घर पस्त्यं हा शब्द स्त्यै धातूपासून काढतात. अपस्त्यायते संघातीभवति पस्त्यं असे निर्वचन क्षींरस्वामीने अमरटीकेत केले आहे. लाकडे, माती, दगड, यांच्या संघाताने जे बनलेले ते पस्त्यं. लाकडे, माती, दगड यांचा संघात करणारा जो पुरुष त्याला अतिजुनाटकालीं पस्त्यृ म्हणत. अपस्त्यै धातूला ऋ प्रत्यय लागून अतिजुनाट भाषेत अपस्त्यृ व (अलोप होऊन) परस्त्यृ असा शब्द निर्माण झाला. ऋप्रत्यय लागून कर्त्रर्थक शब्द जुनाट भाषेत होत. पैकी जुनाटभाषेतून वैदिकभाषेत आलेले देवृ व नृ हे शब्द प्रसिद्ध आहेत. दिवे र्ऋ: व नयते डिंच्च या उणादिसूत्रात दिव् व नौ धातूंना ऋ प्रत्यय लागून देवृ व नृ हे शब्द होतात म्हणून सांगितले आहे. ऋ प्रत्यय लागण्यापूर्वी टि चा लोप होतो. तद्वत् स्त्यै यातील ऐ चा लोप होऊन व ऋ प्रत्यय लागून अपस्त्यृ ह्न पस्त्यृ शब्द निर्माण झाला. हा पस्त्यृ शब्द इतका जुनाट आहे की, वेदकाली तो वैदिक भाषेत आला नाही. अपपूर्वक स्त्यैपासून जसा पस्त्यृ शब्द निघाला तसा नुसत्या स्त्यै धातूपासून रस्त्यृ शब्द पूर्ववैदिककालीं निघाला. स्त्यृ म्हणजे दगड, माती, लाकडे इत्यादीची जुळवाजुळव करून घर करणारा. स्त्यृ या पुल्लिंगी शब्दाला ई प्रत्यय लागून स्त्रींलिंगी स्त्ऱ्यी शब्द झाला. या स्त्ऱ्यी शब्दाचा अपभ्रंश स्त्री हा शब्द वेदात आढळतो, स्त्ऱ्यी शब्द आढळत नाही. म्हणजे स्त्ऱ्यी शब्द वेदकाली लुप्त होऊन गेला होता. स्त्री शब्द चालविताना स्त्ऱ्यी या जुन्या शब्दाची जरूर पडणार आहे, सबब हा जुना शब्द ध्यानात ठेवावा. स्त्यृ ऊर्फ पस्त्यृ व स्त्यी अशी दोन नवराबायको पूर्ववैदिककाली पस्त्य म्हणजे घर सजवीत. पस्त्यृ शब्दाचा कालाने पहिला अपभ्रंश स् चा ह् चा त् होऊन पत्त्यृ. अन्त्य ऋ चा लोप होऊन पत्त्यृ शब्दाचा एक अपभ्रंश पत्य् व दुसरा अपभ्रंश ऋ चा उ होऊन पत्त्यु. पत्त्य् शब्दाचा अपभ्रंश वैदिक पति ह्न म्हणजे चार पायऱ्या झाल्या. पस्त्यृ उच्चार करणारा पहिला समाज. पत्त्यृ उच्चारणारा पहिल्या समाजाचा वंशज दुसरा समाज. या दुसऱ्या समाजाचा वंशज पत्य् उच्चार करणारा तिसरा समाज आणि शेवटी पति उच्चार करणारा चवथा म्हणजे वैदिकसमाज, तात्पर्य, ऋग्वेदकालीन भाषेच्या पूर्वी तीन भाषा होऊन गेल्या होत्या तेव्हा पस्त्यृ हा शब्द बोलण्यात व वापरण्यात येत होता. ऋग्वेदाचा काल आजपासून पाच हजार वर्षापूर्वींचा धरला व प्रत्येक भाषेची यात १५०० वर्षाची धरिली तर पस्त्यृ शब्द वापरणारा समाज ऋग्वेदकालीन समाजाच्या ४५०० किंवा ५००० वर्षे मागे जातो व आपल्या वर्तमानकाळाच्या दहा हजार वर्षे पाठीमागे जातो. पस्त्यृ शब्दाचा अपभ्रंश जो पत्त्यृ जो पत्त्यृ अथवा पत्त्यृ शब्द तो येणेप्रमाणे चाले :
१ २ ३
१ पत्या पत्यारौ पत्यार:
पत्यरौ पतार:
२ पत्यारं ' ' पत्यृस्
३ पत्र्या पत्यृभ्याम् पत्यृभि:
४ पत्र्ये ' ' पत्यृभ्य:
५ पत्त्यु: ' ' ' '
६ ' ' पत्त्यो: पत्त्यृणाम्
७ पत्र्यि ' ' पत्त्यृषु
८ पत्यर्