इकारान्त पुल्लिंगी शब्दांप्रमाणेच उकारान्त पुल्लिंगी शब्द चालतात. यात प्रथमा द्विवचनाची दोन व त्रिवचनाची तीन रूपे आहेत. पैकी हर्य: व हरय: ही एकाच समाजातील जुनी नवी रूपे आहेत. त्या समाजात प्रथमेची रूपे सानुनासिक व निरनुनासिक उच्चारणारे हि दोन भेद होते. या इकारान्त पुल्लिंगी शब्दात भस्थानी म्हणजे तृतीया, चतुर्थी, पंचमी यांच्या एकवचनी आणि षष्ठी व सप्तमी इतक्या स्थानी स्यपासून निघालेले खालील प्रत्यय लागतात :
३ x १ स्या =
४ x १ स्ये =
५ x १ स्येस् ह्न
६ x १ स्येस् ह्न
७ x १ स्यौ ह्न
६ x २ स्योस् =
६ x ३ स्याम् =
७ x २ स्योस् =
७ x ३ स्यु =
पैकी स्येस् व स्यौ हे दोन प्रत्यय इकारान्त व उकारान्त पुल्लिंगी शब्दांपुढे अकारान्त व व्यंजनान्त शब्दांपुढल्या प्रत्ययांहून निराळे आहेत.
१३ इकारान्त व ऊकारान्त पुल्लिंगी शब्दांसंबंधाने विशेष सांगण्यासारखे नाही. कित्येक शब्दांचे द्वितीयेचे अनेकवचन नकारान्त असते व कित्येकांचे विसर्गान्त असते. ऋकारान्त शब्दांसंबंधाने विशेष सांगण्यासारखी बाब म्हटली म्हणजे त्यांचे पंचमीचे व षष्ठीचे एकवचन तुरन्त असते. कर्तृ + स्युस् = कर्तृ: र चा उच्चार उ मध्ये मिळून गेला इतकेच. हा असा र
चा उ होतो हे लक्षात घेण्यासारखे आहे. पती व सखी या शब्दांसंबंधाने पुढे विवेचन व्हावयाचे आहे. तेव्हा या बाबींचा उपयोग होणार आहे. ऋकारान्त शब्दांपैकी कित्येक शब्द सर्वनामस्थानी ऋ चा आर् करतात व कित्येक अर् करतात. पैकी अर् करणारे शब्द जुनाट होत. बाकी अकारान्त, इकारान्त व व्यंजनान्त शब्दांसंर्वधाने जी टीका केली ती च या ऋकारान्त शब्दांनाही लागू आहे. एकारान्त, आणि ऐकारान्त शब्दांसंबंधाने काहीच नवीन सांगण्यासारखे नाही. ओकारान्त व औकारान्त शब्दांपैकी गो शब्द लक्ष आहे. या शब्दाच्या पूर्ववैदिक समाजात चार विधा होत्या, (१) गौ, (२) गो, (३) गा व (४) गव्.
शिवाय समासात गु शब्द येई ती पाचवी. या चारी शब्दांची रूपे गो शब्दाच्या पाणिनीय रूपावलीत येतात. याचा समाजदृष्ट्या अर्थ एवढाच की, पूर्ववैदिककालीं हे चार शब्द निरनिराळे चार समाज बोलण्यात आणीत. गो शद्ब स्त्रीलिंगी व पुल्लिंगी सारखा च चालतो हे ध्यानात घेण्यासारखे आहे.