१२ आता स्वरान्त शब्दापैकी अकारान्तेतर शब्द विवेचनार्थ घेऊ. इ, ई, उ, ऊ, ऋ, ए, ऐ, ओ, औ, व आ असे अकरा स्वर शब्दांच्या शेवटी असतात, नमुन्याकरिता हरि हा पुंल्लिगी शब्द घेतो.
१ २ ३
१ हरि:, हरिँ: हरी हरय:, हर्य:, हरीन्
हर्यौ
२ हरिम् हरी, हर्यौ हरीन्
३ हरिणा हरिभ्याम् हरिभि:
४ हरये ' ' हरिभ्य:
५ हरे: ' ' ' '
६ ' ' हर्यो: हरीणाम्
७ हरौ ' ' हरिषु
८ हरे
(१) हरि + स् =हरि+ ह्=हरि:, हरिँ:
* हरि: व हरिँ: अशी दोन रूपे होत. अणोऽ प्रगृह्यस्यानुनासिक: या सूत्राचे विवरण व अनुवृत्ती भट्टोजीने अशी केला आहे. अप्रगृह्यस्य अण: अवसाने अनुनासिक: वा स्यात्. अप्रगृह्य अण् अंती विकल्पाने अनुनासिक होतो. प्राय: प्रत्येक स्वर अनुनासिक उच्चारण्याचा कित्येक पूर्व वैदिक समाजाचा स्वभाव होता. ते हरि: हे रूप हरिँ: असे सानुनासिक उच्चारीत, सबब ते इथे पुढे साधनिकेत उपयोगी पडणार म्हणून दिले आहे. कोकणे किंवा गुजराथी स्त्रिया ज्याप्रमाणे सर्वच स्वर सानुनासिक उच्चारतात त्याप्रमाणे सानुनासिक उच्चार करणारा एक पूर्व वैदिक समाज होता.
(२) हरि +स्+स् = हरि +अ+उ = हर्यौ
हरि+स्+स् हरिं: =हरिहि =हरिइ = हरी
* ऱ्ह = ह चा पूर्वसवर्णत्व पावण्याचा स्वभाव आहे.
* औ स्थानीं इ आदेश येतो म्हणून पाणिनी सांगतो.
(३) हरि+स्+स्+स् = हरि+अ+ह्+ह् = हर्य: = (र्य उलगडून) हरय:
हरिँ+स्+स्+स् = हरिँ + इ+ इ+ह् = हरीँ ह् + हरीन्