Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पहिला (१७५०-१७६१)
श्रीशंकर
नकल* फर्मान वालाशान बनाम बालाजी बाजीराव वलकाबेहेकी
या दिवसांत अहदनामा मल्हारराव होळकर बअलकावे व जयाजीराव शिंदे बअलकाबरुफकाये आंखलासहऊसीपाहचे मजमूनहे की श्रीमहादेव व खंडेराव व धर्म व आईन आपले दरमीयान व जामीन आहेत की मादाम ह्यात दरफरमाबारदायी व अतायत व बंदगी व दफेकर्दन दुशमनां अजदिलवजां सई करूं; काय अबदाली, वची राजहा, वची जमीदारान, व काय लहान काय थोर जे कोणी की अमुल हुकूमवालाचा करील तंबीह करूं; आणि हुजूर दरमीयान आणूं; व एकसर मुहुकम अकदखासी तफावत व तजा वज न करुं. ज्यांत सबब खैरीयत सलतनचा वलकाय दौलत अबदमुदतचे होय त्याच प्रो कोशीश करूं आणि ज्यांत सबब रजामंदी जनाब अकदसअलाची व रजामंदी नवाबबहादराची होय व इतफाक वजीररुलमुमालिकबहादराचे त्याप्रमाणें अमलांत आणूं. व जो कोणी दोस्त हजरत जनाब अकदस व दोस्त नवाबबहादराचा होय तोच दोस्त आमचा आणि जो मुखालिफ व दुशमन सलतनत व नवाबबहादराचा होय तोच मुखालिख व दुशमन आमचा व जे कोणी की दरहुकम पातशाईचे तनदरबंदगीत न देत माबंदहा त्याला तंबीह करूं
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
राजाश्रियाविराजित बाळाजी बाजीराव यांस दिलेल्या उच्च फरमानाची नक्कल.
प्रस्तुत राजश्री मल्हारराव होळकर व पातशहाचे दोस्त आणि वीरशिरोमणि जयाजीराव शिंदे यांच्याशीं तह येणेंप्रमाणें केला जातो कीं - श्रीमहादेवाची व खंडेरावाची व धर्माची व स्मृतीची शपथ व साक्ष तुह्मा आह्मास आहे कीं - आह्मी आमरणांत तुमची आज्ञा व सेवा व चाकरी व तुमच्या शत्रूचें पारिपत्य करण्याचा मनापासून प्रयत्न करुं - मग तो शत्रू अबदाली असो किंवा दुसरा कोणी राजा असो अथवा एखादा लहान मोठा जमीदार असो - सारांश, जो कोणी सरकारचा हुकुम मोडील त्याला तंबी देऊं व हजरच्या पुढें आणूं आणि आपल्या हुकुमाच्या एक केसभरही कमजास्त वर्तणूक करणार नाहीं. जेणेंकरून आपल्या अखंड राज्याचें व खुद्द हुजूरचें कल्याण होईल अशीच तजवीज करूं; आणि जेणेंकरुन हुजुरचें व नवाबबहादराचें समाधान व वजीबहादराची मर्जी राहील त्याच गोष्टी अमलांत आणूं. आणि जो कोणी हुजूरजनाब यांचा व नवाबबहाराचा दोस्त असेल त्याला आह्मी आमचा दोस्त ह्मणूं व जो कोणी हुजूरचा व नवाबबहादरचा शत्रू व दुष्मन असेल त्याला आह्मीं आपला शत्रू समजूं; आणि जो कोणी सरकारच्या हुकुमीं आपलें तनमन खर्चणार नाही त्याला आह्मी शिक्षा करूं.
*नकल१