Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पहिला (१७५०-१७६१)
प्रस्तावना
(३) ऐतिहासिक लेखसंग्रहांतील १५१ व्या पत्राच्या तिस-या ओळींत १७ जमादिलाखरीं मंगळवार सांगितला आहे; १५३ व्या पत्रांत १८ जमदिलाखरीं मंगळवार सांगितला आहे व ह्याच १५३ व्या पत्रांत अमावास्येला गुरुवार लिहिला आहे. १५३ वें पत्र गुरुवारी लिहिलें आहे, ह्यांत संशय नाहीं; कराण “काली” बुधवार होता म्हणून पत्र लिहिणारा पुढें लिहितो. गुरुवारी अमावास्या होतीं किंवा नाहीं एवढीच शंका आहे. १७ व १८ तारखा चुकल्या आहेत हें निर्विवाद आहे.
(४) काव्येतिहाससंग्रह, पत्रें, यादी वगैरे ८ त आषाढ वद्य ५ ला रविवार व १० ला शुक्रवार आहे; जंत्रींत ह्या दोन्ही तिथींस अनुक्रमें सोमवार व शनवार आहे. उत्तर चोवीस रमजान शनवारी लिहिलें आहे. पत्र शुक्रवारी २३ रमजानला आलें. शुक्रवारी पेशव्यांच्या पंचांगांत १० मी होती.
(५) काव्येतिहाससंग्रह, पत्रे व यादी १७ व्या पैवस्तींत ज्येष्ठ शुद्ध १५ सोमवारी आहे; जंत्रींत पूर्णिमेचा क्षय आहे.
(६) काव्येतिहाससंग्रह, पत्रें व यादी ४२९ त ३९३ पृष्ठांच्या खालून ३ -या ओळींत शके १६५२ साधारणनाम संवत्सरी फाल्गुन शुद्ध ३ ला मंदवार दिला आहे; जंत्रींत रविवार आहे. पत्रांतल्याप्रमाणें शनवारीं दोन प्रहरीं दिवसा ३ होती. तेव्हां रविवारी जो तृतीयेचा शेष राहिला असेल त्याच्या जोरावर रविवारी ३ या होऊं शकेल कीं काय?
(७) काव्येतिहाससंग्रह पत्रें व यादी ४३० त चैत्र शुद्ध ३ ला इंदुवासर दिला आहे; जंत्रींत मंगळवार आहे.