Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

 

[२१७]                                       पे॥छ १६ जिल्हेज.।। श्री ।।            १६ जुलै १७६०.

राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसः

पोष्य सदाशिव चिमणाजी नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन करीत गेलें पाहिजे. विशेष. आह्मीं सरदार जाट सहवर्तमान छ २ जिलकादीं मथुरेवर आलों. पुढें कर्तव्यार्थ करीतच आहों. पलीकडे उतरावें तर नदीस पाणी फार. त्यांत जाटांकडील हजार दोन तीन फार२९६ उतरली. मानाजी पायगुडे वैगैर सरकारचीं पतकेंहि उतरणार. पलीकडील ठाणियांचा बंदोबस्त करावयास हे फौज फार उतरली. यावरून अबदालीकडीलहि मातबर फौज इकडील शहास येणार. यास्तव तुह्मीं फार सावध राहणें. ठाण्यांचा बंदोबस्त उत्तम रीतीनें करणें. कदाचित् तिकडे त्यांची फौज आली, तर ठाणेदार मरत न पळत ऐशी मजबुदी करणें. येथेंहि सरकारची आणखी फौज फार उतरली, तर तुह्मांसहि वरचेवर इतला दिला जाईल. परंतु सावधगिरीनें राहणें. रवाना छ २ जिल्हेज. बहुत काय लिहिणें. हे विनंति.