Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

 

[२१५]                                       ।। श्री ।।            ८ जुलै १७६०.

राजश्रीयाविराजतराजमान्यराजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यास:

पो॥ सदाशिव चिमणाजी नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जाणें. विशेष. तुह्मीं आषाढ शुद्ध पौर्णिमेचीं पत्रें पाठविली तीं छ २२ जिलकादीं पावली. लिहिलें वर्तमान सविस्तर कळलें. कलमें बि त॥.

सुज्याअतदौल यांस कित्येक प्रकारे खरीं लटकीं बोलोन नजीबखान याणीं बीर देऊन अबदालीच्या भेटीस चालविलें. सुज्याअतदौलास कित्येक पुराणे नामी लोक सांगत होते. जे मराठ्यांशी सलूख करणें उत्तम आहे; अगर दोहींकडीलहि भावगर्भ पाहून मग जिकडील जोरा तिकडे सलूख करावा. तूर्त अबदालीकडे जाऊ नये. याप्रमाणें सांगत असतां न ऐकून जावयाचें केलें आहे. जात आहेत. कसकसें शेवटास जाईल. पहावें ह्मणून लिहिलें तें कळलें. ऐशास सुज्याअतदौला अबदालीकडे गेले. जे जे करार केले ते लटके, आणि अबदालीच त्यास फार चांगला वाटला. याउपरी त्याचें अन्न इकडे नाहीं. यास्तव गंगापारचे जमीनदारांजवळून दंगा करवावा. बलवडसिंग यास लिहावें, आणि त्याचे तालुक्यांत गंगापार उतरावयाचा प्रकार असेल ती जागा पहावी. जें बोलतील मागतील तें लावावें. हें काम करावें लागतें. चालना करणें. जे तुमसे हातीं असतील त्यांस ठीक करणें. लिहून पाठविणें. अंतर्वेदींत उतरून आपला अमल करणें. ठाणीं सारीं बसवणें. वरचेवरी वर्तमान लिहीत जाणें.

अकबरपूरचें ठाणें, गोपाळराव बापूजीचे ठाणेदारानें टाकलें होतें, आणि जमींदारांनीं शह टळतांच त्याचे कमाविसाराचें ठाणें बसविलें. त्यास तिकडील बंदोबस्त कसा आहे तें लिहिणें.

राजश्री रामाजी अनंत व नारो शंकर सुज्यातदौले याकडे रवाना केले आहेत, त्याच्या थैल्या पत्रें पाठविलीं तीं पावलीं. आजच याचा मजकूर लिहून सुज्यातदौलाकडे जोडी रवाना केली आहे. उत्तरें लौकरच येतील. व हे उभयता इकडे आलियावर ते आह्मी मिळून जाऊं. जरी त्यांचा मुकाम कोठें आह्मी जाऊ तो जाहल्यास उत्तम आहे, आणि दरकूच गेले तरी उपाय नाहीं ह्यणून लिहिलें तें कळलें. ऐशियास सुज्याअतदौला तिकडे गेले यास हुजूर बोलाविले आहेत. आगरियास पलीकडून येतील अथवा इकडूनच येतील. पुढें उपयोग देखिला तर पाठवूं.

पैकियाची कांहींच तरतूद होत नाहीं. हें फारच अपूर्व आहे असें तुह्मांस नसावें. जलदीनें पैका पोहोंचविणें.

गोपाळराव गणेश याचा अमल चांगलाच आहे. आतां यांणीं, तुह्मीं, गणेश संभाजी याणीं आपली सारी फौजसुद्धा निघोन कोळजलेश्वर या सुमारें भिवगांव येथवर यावें. सकुराबाद वगैरे ठाणीं बसलीं राहिलीं ती बसतील. सकुराबाद मातबर ठाणें आहे, तेथें सारियाचा जमाव पाडून अमल ठीक करणें. अगरियास पूल बांधून इकडूनहि फौजा पार उतरून पलीकडे येईल, आणि तिकडील बंदोबस्त ठीक करणें. याउपरि पार उतरून कोळपर्यंत बंदोबस्त करावयास चिंता नाहीं. जाटांचीं ठाणीं जाट कायम करणार व केलीं. फौजहि त्याची सरकारची उतरणें. तुह्मीं तिकडून येणें ह्यणजे ठीक होऊन येईल. ठाणि यांची मजबुती चांगली करणें. जाणिजे.

रवाना छ २४ जिलकाद. हे विनंति.