Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

 [७३]                                                                    ॥ श्री ॥                                                २२ आगष्ट १७५७.

श्रीमंत$ राजश्री पंतप्रधान स्वामीचे सवेसी:

विनंति सेवक दत्ताजी शिंदे कृतानेक विज्ञापना. सेवकाचें वर्तमान तागाईत छ ६ जिल्हेज पर्यंत यथास्थित असे. विशेष. आज्ञापत्र रविवारचें पाठविलें तें येथें सोमवारी दोन प्रहरां पावले. जीवनराव यांची पत्रें आलीं ती बजिन्नस पहावयास रवाना केलीं असत. पाहून आपल्या मतें निश्चय कैसा।

तो सत्वर लेहून पाठवावा. आमच्या मते बराच विचार आहे. या गुत्यांतून मोकळें व्हावें, ह्मणून आज्ञा केली. तर जीवनरायानें१६६ लिहिलेयाप्रमाणें झालें तर उत्तम आहे. पंचवीसा लक्षा रुपयाची जाहागीर, दोन स्थळें, चांगलीं, कज्जा न होतां, मोगल देऊन सलूख करीत असले तर बरेंच आहे. हें साधल्यावर पुढें आणखी त्याजपासून घेतलें जाईल. दिवसेंदिवस मोंगल क्षीण होत जाईल त्याप्रमाणें वरचेवर पुढें आणखीहि साधलें जाईलः ऐसें करितां मोगलानें अनुसंधान लावून फौज जमा करून बळ धरलें तर आह्मीहि जात आहों. स्वामीच्या तेजप्रांतेकरून मनोदयानुरूप होऊन येईल. जे दिवशीं आह्मी बाहेर निघालों तेंच दिवशीं चारशें पांचशे स्वार नगरास पाठविलें. त्यांनीं किल्याभोंवतीं चौक्या बसवून रसद बंद केली असे. गंगातीरासहि पांचशे साशे स्वार पाठविले असत. जो कोणी आह्मांजवळ येतो त्यासी वरचेवर तिकडेच पाठवितों. आह्मांपाशींहि पाचशे साशे लोक जमा आहेत. मागूनहि फौज येऊन जमा होतच आहे. हळूहळू मजली ती ती चौ चौ कोसांच्या लोकाकरितां करून गंगातीरास जातों, तों लोकहि कुलीं जमा होतील. इतक्यांत जीवनराव याजकडीलहि पत्रें येतील. त्यांत धातुपोषण आहे किंवा निश्चयात्मक करार करून देतील हेंहि कळों येइल. शहरींहून आमची बातमीची खबर आली आहे. मोगलानें तमाम सरदार, मराठे व फिरंगी, यासी पत्रे पाठविलीं आहेत. आणि वरचेवर सांडणीस्वार जात आहेत कीं सत्वर येणें. निजामअल्लीकडे पत्रें व-हाड प्रांतीं गेलीं असेत. त्यांनींहि तेथून कुच केलें. त्या ब॥ च्यार पांच हजार फौज आहे. शहरांत नवी फौज ठेवितात. याप्रमाणें वर्तमान आलें असे. कदाचित् बसालतजंगानें हे कुलीं जमा व्हावयानिमित्य जीवनरायासी अनुसंधान लावून जमा झाल्यानंतर पुन्हा दुसरी गोष्ट सांगितलीच, तर चिंता काय आहे? स्वामीच्या आशीर्वादें करून सर्व पादाक्रांत होऊन केला मनसबा शेवटास जाईल. मोगलाचीं पत्रें सरदारास व निजामअल्लीस व फिंरगीयांसी गेलीं आहेत. ते जमा होतील किंवा नाहीं हें नकळे. आलें वर्तमान सेवेसी विनंति लिहिली असे. श्रीमंत राजश्री रावसाहेबहि१६७ येतील ह्मणोन आज्ञा केली, तर बहुतच उत्तम असे. साहेब आल्यावर आमच्या हातें सेवा चाकरी होईल त्याचा मजुरा होऊन येईल. खावंद संनिध असल्यास आह्मी सेवा चाकरी करून दाखवूं ते स्वामीस विदित होईल. रामरायास जरूर पाठविणें ह्मणोन आज्ञा, तर म।। निल्हेस सत्वरींच सेवेसी पाठवून देतों. सेवेशी श्रृत होय. हे विज्ञाप्ति.
पै।। छ ७ जिल्हेज, मंगळवार, प्रहर रात्र आवशीची.