Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पहिला (१७५०-१७६१)
[६८] पै छ १६ सवालसमान. श्री १५५ भवानीप्र॥. १९ जून १७५७.
श्रीमंत सद्गुणमूर्ति साहेबाचे से॥
आज्ञाधारक कृष्णाजी त्रिंबक सा। नमस्कार उपरी विनंति. किल्ले दौलताबाद१५६ स्वामीनीं शहानवाजखान आपला मित्र जाणून त्यास घेणें ह्मणोन परवानगी पाठविली त्याजवरून व किल्ले मजकूर फत्ते केलियावर मुबारकबंदीचीं१५७ पत्रें पाठविलीं याजवरून शहानवाजखान फारच संतोष पावला. यह सानमंद झाला. स्वामींची मरजी कांहींक दिवसांपासून कीं किल्ला अहमदनगर१५८ सरकारांत मागावा, हें त्यास कळलें होतें व सांप्रत तीर्थरूप रा॥ जीवनराव केशव यांचेहि सांगितल्यावरून स्वामींची मर्जी त्यास पुरती कळली. त्याजवरून स्वामींची खातर जरूर जाणून किल्ले अहमदनगर स्वसंतोषें स्वामीचे नजर केला. स्वामींनीं घ्यावयासीं सनद करून देतां येत नाहीं. येथील सर्व लोक शब्द लावतील. यास्तव परवानगी दिधली पुरे. स्वामीस तो किल्ला घेणें कांहीं कठीण नाहीं. परंतु येथील परवाने जागिरीचे जाल्यानंतर विनंति लिहूं तेव्हां किल्यास माहसरा करावा, आतांच आरंभ न करावा, व चर्चाहि या गोष्टीची न व्हावी. कांहींक दिवस गोष्ट चित्तांतच राहिली पाहिजे. कविजंग तेथें आहे. त्याणें तेथें राहिल्याचीहि चिंता नाहीं. कदाचित त्यानें तेथें नसावें, नवाबापाशीं यावें, अशी सलाह असलिया आज्ञा सादर व्हावी. ह्मणजे त्यास तेथून येथें आणावयाचा प्रयत्न केला जाईल. सविस्तर तीर्थस्वरूप राजश्री जीवनराव केशव यांचे विनंतिपत्रावरून अर्थ कळों येईल हें विनंति.
र।।छ १ १ सवाल.