Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पहिला (१७५०-१७६१)
[६२] श्रीगणराज. २२ मार्च १७५७.
श्रीमंत राजश्री पंतप्रधान स्वामीचे सेवेसी:-
विनंति सेवक गोपाळराव गोविंद व मल्हारराव भिकाजी कृतानेक साष्टांग नमस्कार विज्ञापना येथील वर्तमान त।। छ १ स्वामीचे कृपेकरून यथास्थित असे. विशेष. स्वामींनीं कृपाळू होऊन छ २९ ज॥खरचीं पत्रें सांडणीस्वाराबराबर पाठविलीं तीं छ ३० ज॥खरीं बागुराहून कुच जाहलें त्यासमयीं प्रातःकाळीं पावली. राजश्री बनाजी जाधवराव यांस पत्रें होतीं तीं त्याच सांडणीस्वाराबराबर पट्टणास रवाना केलीं. त्यावर बागुराहून ।। चंदराज पट्टणास दाखल जाहल्यावर संध्याकाळी छ २८ ज॥खरचीं पत्रं सांडणीस्वाराबराबरच स्वामींनीं प।। तीं पाहोन परमाल्हाद जाहाला र।। बनाजी पंतास पत्रें होतीं तीं आज सांडणीस्वाराबरोबर रा।। केलीं कडूरबाणावर घेतल्याचें वर्तमान पट्टणाहून बनाजीपंत व नागोपंत वकील याचीं पत्रें द्वादशी गुरुवारची आलीं. ..... पाशीं आलीं तींच सेवेसी र॥ केलीं आहेत. पावल्यावर साकल्यार्थ विदित होईल त्याजवर पट्टणाहून पत्रें अद्यापि आलीं नाहींत. आल्यानंतर सेवेसी पाठवून देऊ. खंडणीचा अजमास, स्वामीचे आज्ञेप्रमाणेंच त्यास वरचेवर लिहीत आहों. खास स्वारी समीप आली. आह्मीहि दरमजल पुढें जातच आहों. त्यास वरचेवर खबरी गेल्या आहेत. *तिकडून व इकडून मुलूख खराब होऊन ठाणीठुणीं तमाम गेलीं हें वर्तमान कळोन डोळे उघडले असतील. बनाजीपंतांशीं बोलून र।। करणार होते. परंतु, दुसरी पत्रें आलीं नाहींत; आज उद्या येतील; तेथील दम कळत जाईल तसतसा येथूनहि जरब द्यावयाचा व बोलावयाचा विचार होईल. आह्मी पुढेंच आहों. तीन साडेतीन गांवें येथून पट्टण आहे. खासा स्वारी दरमजल येतच आहे. त्या सुमारावर आह्मी पुढें पट्टणासच जाणें पडलें तरी जातो. पट्टणकराची फौज येणार तेहि बातमींत आहों. कडूरबाणावर घेतल्यावर पुढें ठाणीं घेत येथें आलो. पट्टणची पेठ चंदराज आह्मीं दोघे निघाल्यापूर्वी पुढें लुगारे धाडून पेठ लुटून घेतली. आह्मी येतांच धास्तीनें कौलास येऊन ठाणे दिल्हे. ठाणे फार चांगले आहे. परंतु माणूस पोंकें ! फौज गावाजवळ येताच अवसाने जाऊन ठाणीं देतात ! स्वामीचें पुण्य विचित्र आहे ! खासा पट्टणचा हिसाब धरीत नाही. परंतु, एकाएकी जाऊन थडकवें ते उत्तम नाही.