Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

[१५]                                                                ।। श्री ।।                                                               १५ सप्टंबर १७५३

 

पुरवणी ।। श्रीमंत राजश्री            पंतप्रधान
स्वामीचे सेवेसीः-

कृतानेक विज्ञापना. छ१६ जिलकादीं दोन प्रहरां राजश्री दीनानाथ गोविंद व सेवक ऐसे नवाब गजफरजंग यांचे मुलाजमतीस गेलों. छ १४ जिलकादीं बोली जाली ते मजकूर अलाहिदा विनंतिपत्राचे पुरवणींत लिहिले आहेत. तें पत्र त्यांस अक्षरशा सार्थ वाचून दाखवून समजाविलें. अबदुल रहिमानखान मुनसी समीप होते. पत्र आइकोन बहुत संतोष पावले. बोलिले कीं ज्याप्रमाणें तुह्मी आह्माजवळ बोलिलेस व त्याचे जबाबांत आह्मी तुह्माजवळ बोलिलों तेच मजकूर येक जरा तफावत न करितां कलमबंद केलें; सदर्हूप्रमाणें आमचा करार आहे ह्मणोन रावसाहेबांस लिहिणें. आणीक बोलिले कीं कर्नाटक नवाब सलाबतजंगांहीं आमचे खावंदास दिधलें; आह्मीं आइकतों कीं रावसाहेब महमद अल्लीखानाची६५ कुमक करणार; कर्नाटकांत फौज पाठवणार; याजकरितां रावसाहेबांस ल्याहावें कीं महमदअल्लीखान तगीर. सनद आमचे खावंदास जाली. मुलुक आमचे हाताखालें आला. महमदअल्लीखानाकडे त्रिचन्नपाल्ली व अर्काट मात्र आहे. त्याजवळ फौज नाहीं. सर्वा गोष्टींनीं अजीज आहे. रावसाहेबांची आमची दोस्ती. रावसाहेबीं येक गुमास्ता आमचे खावंदाजवळ पाठवावा. चौथ सरदेशमुखीचा पैका होईल. तो आह्मी देऊं. याजमुळें मुलुक आबाद राहील. दुतर्फा किफायत आहे. महमदअल्लीखानास आमचा वसवाद असिला तर आपण त्यास कौल देऊन६६ बोलवावें. आह्मी नवबा सलाबतजंगाजवळोन त्यास दुसरा मुलुक देववूं; हा आमचा करार आहे; ह्मणून बोलिले. त्याप्रमाणें सेवेसी विनंति लिहिली आहे. काय आज्ञा ते करावयास स्वामी समर्थ आहेत; येविसीं त्यांहींहि सेवेसी विनंति लिहिली आहे. दुसरें बोलिले कीं गोवरनदोर६७ यांहीं आह्मास लिहून पाठविलें आहे. साता रोजांनीं खत आलें. लिहिलें आहे कीं मुरारराव६८ घोरपडे यांही तीरचनापलीस आमचे फौजेबरोबर राहोन बहुत ज्यांफीशानी केली. सुभानराव मुरारराव यांचा भाऊ कामास आला. याजकरितां तुह्मी रावसाहेबांस लेहून पाठवावें कीं मुरारराव आपले जाणोन यांजवर मेहेरबानी करावी, ह्मणोन लिहिलें आहे; तर तुह्मी हे गोष्ट रावसाहेबांस लेहून मुरारराव याजवर नेकनजर धरीत तें करावें व आमचें गोवरनदोरास रावसाहेबांचें खत आणवावें कीं तुमचे लिहिलेप्रमाणें मुसाबुसी यांही मुरारराव यांविषयी आह्मांस सांगितलें. आह्मी त्याजवर खुष आहों. येखलासांत तफावत होणार नाहीं. ऐसें पत्र आलियानें आमचें खावंद आह्मावर संतोषी होतील ह्मणून बोलिले. त्याजवरून विनंति लिहिली आहे. कृपा कारावयास स्वामी समर्थ आहेत. दुसरें बोलिले कीं नसीरजंगामध्यें व आह्मामध्यें पहिली नाखुषी बहुत होती. हल्लीं त्यांही महमद हुसेनखान दिवाण याजबराबर कसम खाऊन सांगून पाठविलें कीं तुह्माजवळ आमचा दुसरा विचार नाहीं. तुह्मी आह्मी एक आहों. हा आपला करार आहे. ह्मणोन ऐशास त्यांही कसम खाऊन सांगोन पाठविलें. त्याप्रमाणें आह्मी त्यास वचन दिधलें कीं तुह्मी निखालस असलियास आमचाही तुम्हाजवळ दुसरा विचार नाहीं. हे गोष्ट रावसाहेबांस आह्मी लिहितों. तुह्मी लेहून नसीरजंगाशीं रावसाहेब बेवसवास राहात ते गोष्ट करावी. आधीं तर नसीरजंग निखालस आहेत. मबादा।। त्याजवळोन कांही तफावत नजरेस आला तर आह्मास सांगावें. आह्मी त्यास राहावर आणूं, निदान तंबी करूं, ह्मणोन बोलिले. त्याप्रमाणें सेवेसी विनंति लिहिली आहे. दुसरें बोलिले कीं गुदस्ता आमचे मारिफतीनें तह जाला त्याप्रमाणें करार असावा. तुमचे दोस्त ते आमचे दोस्त. आमचे दोस्त ते तुमचे दोस्त. आमचे दुशमन ते तुमचे दुशमन. तुमचे दुशमन ते आमचे दुशमन. याप्रमाणें खातीरेस आणोन अमलांत आणावें ह्मणून बोलिले. तेणेंप्रमाणें सेवेसी विनंति लिहिली आहे. सदर्हू विनंतिपत्र नवाब गजफरजंग यांहीं अक्षरशा आइकिलें. सेवेसी श्रुत जालें पाहिजे हे विज्ञापना. आणीक बोलिले कीं नवाब सलाबत येहीं आह्मांस लिहिलें आहे जे रावअजम फौज जमा करितात. गुदस्ताहून ज्याजती फौज धरिता याचा सबब काय? ह्मणोन येविषई रावसाहेबांची मर्जी काय ह्मणोन पुसिले. सेवक बोलिलों कीं फौज सालाबादाप्रमाणेंच आहे. रावसाहेबांस काजकामें बहुत आहेत. येक तर मोगलाचा दगाबाजीचा रूख नजरेनें पाहिला तर याजकरितांहि खबरदार राहावें लागलें. दुसरें गुजराथेंत व दिल्लीस फौज रवाना करणें. ऐसीं कितेक कामें आहेत. परंतु फौज अद्याप जमा जाली नाहीं, व रावसाहेबहि डेरेदाखल जाले नव्हते. फौजेस ताकीद जाली आहे. फौज जमा केलीच पाहिजे. फौजेखेरीज काजकामें कसीं होतील? ह्मणोन बोलिलों. आणीक मुसाबुसी बोलिलें कीं नसीरजंगांनी आह्मांस लिहिलें आहे कीं सालमजकुरीं आह्मास पेशकसीच्या ऐवजाकरितां श्रीरंगपट्टणास जावें लागतें. सरकारांत खजाना नाहीं. सीबंदीस ऐवज पाहिजे. याजकरितां श्रीरंगपट्टणास जाऊन ऐवज आणून सरंजाम करावा लागतो ह्मणोन लिहिलें आहे. हें वर्तमान तुह्मी रावसाहेबांस लेहून पाठविणें. त्याजवरून सेवेसी विनंति लिहिली आहे. सेवक बोलिला कीं रावसाहेबांचा ऐवजहि पट्टणवाले याकडून येणें आहे. सालगु।। पेशजीची बाकी होती त्यापैकीं कांही ऐवज आणिला. सेवेसी विदित जालें पाहिजे हे विज्ञापना.