Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

[६]                                                                ।। श्री ।।                                                               ८ सप्टंबर १७५१

 

पु ।। श्रीमंत राजश्री            पंतप्रधान
स्वामीचे सेवेसीः-

कृतानेक विज्ञापना. शहराबाहेर लश्कर कितीक उतरलें ह्मणोन पहावयास मुजरद जासूदजोडी पाठविली होती. त्यास जयसिंगाच्या तळेयावर रायचूर आदवानीवाला, आचार्य दि ।। राजे रघुनाथदास, त्याचे स्वार दोन हजार अजमासे आहे व भावसिंगपुरेयांत फतेसिंग सिनरवाला दोनसें स्वारनसी आहे. व भानजी खताल दि ।। गायकवाड दोनशे राऊतांनसी जैसिंगपुरेयाबाहेर उतरला आहे. येकूण बाहेर शहराचे जमाव सदर्हूप्रमाणें आहे. बाकी स्वार शहरांत जागा जागा आहे, त्याचा सुमार कळत नाही. व दिल्लीदरवाजाबाहेर गाडदी फिरंगी याचा प्यादा अडीच तीनेक हजार आहेत. त्यामध्ये प्यादा पंचमेळ, परदेसी, मराठे, मुसलमान वगैरे असे आहेत. नवाबाचे कारखाने अद्याप आले नाहीं. आणावयाची ताकीद जाली आहे. नवाब छ २७ सवाली शनवारी सीकारास महमुदी बागांत गेले आहेत. समागमें खान वगैरे अमीर गेले आहेत. सेवेसी श्रुत जाले पाहिजे. हे विज्ञापना.