Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड नववा (तंजावरचा शिलालेख)
आपलें करून घेऊन त्याचें मन्नहीं घेऊन, राज्य आक्रमणेस, अपले दुसरे लेंक मदारमुलुक ह्मण्णारास, अधिकार देऊन फौजेनिशी आकार्णिककडून पाठविले. त्यानी तंजाउरास पाऊन कांहीं युत्ध, कांहीं कृतृमाचे बळानें, तंजाउराचा किल्ला व राज्यहीं अक्रमऊन घेऊन किल्लपांत अपली ठाणी ठेऊन राज्याचा अधिकार समग्रहीं, महाराजाचे पुरातन शेवक डबीर नारापंताचे स्वाधीन करून आपण कित्येक दिवस कुंभकोणांत असून, त्यानंतरें निघून चन्नपटणास नवाब महमदल्लीखानाकडून जाऊन पावले. येणेंप्रमाणें नवाबास तंजाउर राज्य दोनि वर्षे अधिकार चालिला. तंजाउर राज्य शंभू महाराजापासून भोंसल वंशास चालत आल्यांत, वरकड फौजेचा विचार कैला असल्यांहीं, राजाचे आप्त परिवार मात्र युत्धास प्रवर्तल्यां बहुत सेनेचा नाश करूसकतील अैसें असतां, हा किल्ला अत्याक्रांत जाहला कीं, ह्मणून ह्मणावतरि सकळ जनानें हीं येक दोषारोपण करावयांस ठाव जाहाला ते काय ह्मणिजें, तुळजामहाराजास राज्यपद प्राप्त जाहल्यापासून बहुत दान धर्म केले, बहुत अग्रहारें दान केले, बहुत देवालयाचा उत्धार केला, तुरूकांचे मताचास देखोल अनेक धर्में उर्जीत कडून केले; स्वतेवराजे बुत्धिवंत सकळ विद्याहीं जाणणारा आंगकडून चांगले शूरहीं ऐसा महाराजास राज्यपद प्राप्ति नंतरें चार वर्षाउपारि, दुष्ट सामदिकाचे सहावास घडत आल्यामुळें त्यांच्या विपरीत बुत्धीस, महाराजाचे चित्तहीं थोडें अनु[स]रावें. यास अंगिकारिल्याकरितां त्या दुष्ट सामादिका कडून कित्येक दुकृतें महाराजास कळून नकळूनहीं घडत आली. त्यांत लिंगोजी भोंसलेस प्रतिनामे गिलि बिलि अण्णा ह्मण्णार येकास आमात्य पद प्राप्त जाहले. त्या गिलिबिलिर्न राज्यांत त्याचा जिनस कळावयास प्रसक्ते पदारूढ होऊन असतां, ब्राह्मण जाते देशस्त आरणीकर कोनेरराव ह्मण्णार येका जमीनदारानें आपल्या हक्कानिशी गिलिबिलिअण्णाशी आपल्या शिपाईगिरिच्या अंगेकडून जबाब स्वाल केले. त्यात त्यास राग आलासें कळून,