तेव्हां महाराजाची फौजही बाहेरी निघून दोनी तिनी भांडणी चांगल्या रितीनेंदिल्हिं. चंदासाहेब प्रभृतीनी दोनीतिनीदा किल्ला पाडून हल्ला चढूनआले; त्यास येकंदर महाराजानी पाडिला किल्ला यकंदर त्याच्या ठायीं सवेंच सव मजबुदा करून ज्याच्या वेळेस चडला हल्ला त्या त्या वेळेस आपल्या शौर्ये कडून परतविल्यांत चंदासाहेब प्रभृति भग्न होउन कांहीं भांडणें कांहीं संविधान ऐसें करीत होती त्यांस महाराजानी आस्पद न देतां दोने अडीच महिने भांडत होते इतक्यांत नासरजंग बहुत सन्नाहानिशी हैदराबादेतुन निघून आर्काडास आले. त्याचे हरील स्वार पुढें आले त्यान आर्काडांत होता तो चंदासाहेबाकडील सरदार शेषारायास मारून टाकिले ह्मणावयाचे वर्तमान चंदासाहेबास पावताच चंदासाहेब वगै-यांनीं तंजाउरचे किल्यावरी वेडा दिल्हे होते ते हिरासतमोहिदिनखानसमवेत कित्येक सामान देखील टाकून देऊन येकंदर पुदच्चेरीस जाऊन पावले. नत्राब महमदल्लीखान त्रिचनापल्लीतुन निघून नासर जंगासमोर आर्काडास पावले तेव्हां तंजाउरास कुमकेस सांगून पाठविले तेव्हां महाराजांनी आपले फौजदार मानाजीरायास फौज देऊन नासरजंगाचे लष्करास कुमक पाठविले त्यानी जाऊन कित्येक दिवस असुन परतून येऊन पावले त्यानंतरें नासरजंग देवगतीस पावले ह्मणावयाचें वर्तमान हीं आलें सवेंच चंदासाहेबानीं नासरजंग देवगतीस पावतांच निघून त्रिचनापल्लीस युद्धास येऊन श्रीरंगांत फरांशींसाची कुमकही घेऊन उतरले तेव्हां तंजाउरराज्यात चाकर जमादार अल्लंखान ह्मण्णार पठाण येक शंभरघोड्याचा यजमान त्याने प्रतापसिंव्ह महाराजासी बिगडून आपला हक्क धरून घेऊन चंदासाहेबासी मिळून त्याची परवान करून घेउन कित्येक पठाणास मिळून घेऊन त्या अल्लंखानाचा मेव्हणा मधरेच्या मुलुकांत तुरूंबुरुचा जाहागीरदार येक होता त्यांशी संविधान करूत घेऊन नाडचेकळ्ळर कित्येक मिळऊन मधरेवर जाऊन मधरेचे किल्यांन माप्सखाने होता त्यासी भांडून त्याला त्रिचनापल्लीस पळवून आपण मधरा त्रिनलवेली