याचा अर्थ वरी लिहिला आहे कीं त्या उपरी तंजाउरचे राजे विजयराघव नायड वगै-यानी प्रेषकषीषताल बंदीचा ऐवज देण्यास लबाडी करून येकांत येक योग्य अयोग्यतेचें चचपिडून विजापुरास पाठविल्या वकीलाचे निराकरणें करून किल्याबाहेरील दोघे वजीरासहीं दगा करावें याची योजना करून दुसरा कित्ता न पावल्याकरितां बादशाही तें पैक्यास जमा न जाहला तो नायडाचे अमात्यापण करणार व वकीलहीं बिगडून कोटा बाहेरील उभयतां वजीरांपाशी येऊन नायड कूट फार दुवृर्त जाहले चर्याहीं फार अंमगळ वर्तताती राज्यहीं बुडविले, येकांत येक नाहींत । यांच्यानें राज्य सांभाळवत नाहीं करितां तुह्मी हे राज्य आक्रमावें व्यर्थ येकांत येक भांडून पंधरावीसजणांस मारणार आहेत आहे ते फौज ह्या राजाचे वश वर्तत नाहीं उद्यां परह्यांत हल्ला करून राजास मारून लुटणार आहेत करितां तुह्मीच हे राज्य करावें ह्मणून सांगितले तेव्हां ते खादरयेखलास व अबदुलहलीम दोघे वजीरानी येक दोन दिवसाचे अभ्यंतरी राज्य शोध केल्याठाई या उभयतानी सांगीतलें तें येकंदर खरेंच याहीविना राज्यांतील फौजेचे सरदारही येऊन बोलु लागले तेव्हां अशा त्यांस व वकीलासहीं उभयतां वजीरानीं सांगीतलै जे अह्माकडूनच होणार नाहीं । येंकोजीराजे त्रिमलवाडींत आहेत त्यांस अधी पत्र लिहून देतों तुह्मी उभयतां जाऊन त्यांस बलाऊन आणिल्या कार्य साधेल ह्मणून सांगून पत्र लिहिले ते घेऊन अशा त्या वकील उभयतांनीं त्रिमलवाडीस येंकोजी राजापासी येऊन पत्रहीं देऊन किल्यांतील राजाचा व फौजेचा व दाइजाचा विचारहीं जाणऊन प्रार्थना केले तेव्हां येंकोजीराजे जरूरी भांडली फौज मात्र घेऊन तंजाउरास येऊन उभयतां वजीरासीहीं बोलून समागमें घेऊन शके १५९६ राक्षस संवत्सर माघ शुत्ध सप्तमीस तंजाउरचा किल्ला प्रवेश करून अले ते किल्याच्या उत्तरेचा दरवाजानें आंत आले । त्यांनी आला तो दरवाजकरितां अल्लीदरवाजा ह्मणून नांव पडिलें तेथून समोर विदीने दक्षिणेस कित्येक दूर आल्यावरी